… आणि जयंत पाटील यांनी लोकलने सीएसएमटी ते उल्हासनगर केला प्रवास…

403

विद्यार्थी दशेतील लोकल प्रवासातील आठवणींना जयंत पाटील यांनी दिला उजाळा…* मुंबई दि. १३ नोव्हेंबर – पक्षाच्या कामासाठी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी चक्क सीएसएमटी ते उल्हासनगर असा लोकलने आज सायंकाळी प्रवास करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मुंबईमध्ये कमी वेळेत लांबचे अंतर कापायचे असेल किंवा वेळेत कुठे पोहोचायचे असेल तर मुंबई लोकल हा सर्वात उत्तम पर्याय ! हाच पर्याय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निवडला आणि लोकलमध्येही शासकीय कामाचा निपटारा करताना दिसले. आज पक्षाच्या कामकाजाकरीता उल्हासनगरला जात असताना जयंत पाटील यांनी बर्‍याच दिवसांनी आपल्या सहकाऱ्यांसह लोकलने प्रवास केला. विद्यार्थी दशेत असताना जयंत पाटील यांनी लोकलने प्रवास केला आहे तसेच मधल्याकाळातही अनेकवेळा त्यांनी लोकलने प्रवास केला आहे. आजच्या प्रवासातील सहकाऱ्यांसोबत चर्चेदरम्यान सर्व जुन्या आठवणींना जयंत पाटील यांनी यावेळी उजाळा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here