भारतीय हवाई दलाच्या (IAF) MI-17 हेलिकॉप्टर अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांच्यासह एकूण 13 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या १३ जणांच्या पार्थिवांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा देखील किरकोळ अपघात झालेला पहायला मिळाला आहे. गुरुवारी सकाळीच पार्थिवांना वेलिंगटनमधून मद्रास रेजिमेंटल सेंटरकडे नेण्यात आले होतं. रेजिमेंटल सेंटरमधून त्यांच्या पार्थिवांना सुलूर एअरबेसकडे नेण्यात आले होतं.मात्र, या ताफ्यातील एका रुग्णवाहिकेचे संतुलन बिघडलं आणि ती अनियंत्रित होऊन एका लहानच्या टेकडीला जाऊन धडकली. याबाबतचं वृत्त एका वृत्त वाहिनीने दिलं आहे.जनरल बिपिन रावत यांचा मृतदेह त्यांच्या दिल्ली स्थित घरी पोहोचविण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत रावत यांच्या दिल्लीस्थित घरात दोघांचे मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते यानंतर कामराज मार्गावरुन बरार चौकापर्यंत शव यात्रा निघेल, आणि दिल्ली कॅन्टॉन्मेंट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले
Home महाराष्ट्र आणखी एक अपघात! हेलिकॉप्टर दुर्घटनेतील मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात तामिळनाडू मध्ये
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
भारत ब्लॉक संसदीय पॅनेलचे सदस्य 3 विधेयकांवर चर्चा करण्यासाठी वेळापत्रकात सुधारणा करण्याची मागणी करतात
ब्रिटीशकालीन गुन्हेगारी कायद्यांची जागा घेणार्या तीन विधेयकांचा आढावा घेणार्या गृह प्रकरणावरील संसदीय स्थायी समितीचे सदस्य असलेल्या अनेक...
[BREAKING] सत्येंद्र जैन यांनी कारागृहाच्या आतील कोठडीतून मीडियाला व्हिडिओ फुटेज चालवण्यापासून रोखण्यासाठी दिल्ली न्यायालयात...
तुरुंगात असलेले दिल्लीचे कॅबिनेट मंत्री सत्येंद्र जैन यांनी आपल्या तुरुंगातील कोठडीतील कोणतेही फुटेज प्रसारित करण्यापासून प्रसारमाध्यमांना रोखण्यासाठी...
केसीआरची मुलगी विरुद्ध भाजप खासदार, “अश्लील” शेरेबाजीमध्ये चप्पल मारण्याची धमकी
हैदराबाद: तेलंगणा राष्ट्र समितीच्या (टीआरएस) आमदार के कविता यांनी शुक्रवारी भाजपचे खासदार धर्मपुरी अरविंद यांच्यावर टीका केली,...
कारसेवकांच्या अटकेच्या वादात, भाजपने सिद्धरामय्या मंदिरात जाण्यास नकार दिल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे
1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर झालेल्या हिंसाचारात कथितरित्या सहभागी असलेल्या श्रीकांत पुजारीच्या अटकेवरून तीव्र राजकीय वादाच्या दरम्यान,...



