
श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव शिवारातीलनहेरमळा येथे आठ महिन्यांच्या बालकालाविहिरीत टाकून हत्या केल्याची धक्कादायकघटना २७ र्नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.बेलवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत,अवघ्या एक तासात या गुन्ह्याचा उलगडा करतआरोपी सोनाली योगेश दळवी हिस ताब्यातघेतले. आरोपीला न्यायालयात हजार केलेअसता पाच दिवसाची पोलीस पीस कोठडी सुनावलीआहे. याबाबत माहिती अशी की, सुदाम दळवीयांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत कार्तिकयोगेश दळवी (वय ८ महिने) पाण्यावर तरंगतानादिसल्याची माहिती दुपारी १२ वाजता पोलिसांनामिळाली. सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमारसोनवलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकानेघटनास्थळी जाऊन बालकाला बाहेर काढले.याप्रकरणी कार्तिकचे आजोबा अशोक रामकृष्णदळवी यांनी दिलेल्या फियादीनुसार खुनाचा गुन्हादाखल करण्यात आला. याबाबत पोलीसठाण्यात् अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यातआली होती. मात्र, हा घातपात असल्याचा संशयपोलिसांना आला. त्यानुसार तपासाची चक्रेफिरवली. कार्तिकची आई, चुलती व चुलतायांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. मात्र,तिघांकडून विसंगत माहिती देण्यात आल्यानेपोलिसांचा संशय अधिक बळावला. खाकीचाधाक दाखवला असता कार्तिकची आई सोनालीयोगेश दळवी हिने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.
घरात कोणी नसल्याची खात्री करून, रागाच्या भरात तिने कार्तिकला झोळीतून काढून ब्लँकेटमध्ये गुंडाळले आणि शेतातील विहिरीत टाकून दिल्याचे तिने सांगितले. कार्तिकचे वडील योगेश दळवी यांनी पत्नी सोनाली ही किरकोळ कारणांवरून चिडचिड करत असल्याचे आणि मानसिक तणावात असल्याची माहिती पोलिसांना दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमें, उपविभागीय अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे, पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम पवार, पोलीस हवालदार भाऊसाहेब यमगर, रवींद्र औटी, कैलास शिपनकर, दादासाहेब क्षिरसागर, विनोद पवार, सुरेखा वलवे, अविंदा जाधव, भाऊसाहेब शिंदे यांच्या पथकाने केली. तपास बेलवंडी पोलिस करीत आहेत.



