आटपाडी तालुक्यातील 9 गावांमध्ये संचारबंदी- बैलगाडी शर्यत आयोजनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू
सांगली दि 18 (जिमाका) : मा.सर्वोच्च न्यायालयाने छकडा (बैल) गाडी शर्यतीच्या बंदी घातली असल्याने प्रशासनाकडून सदर शर्यतीस परवानगी देण्यात येणार नसल्याने व छकडा (बैल) गाडी आयोजक हे शर्यत घेण्यावर ठाम असल्यामुळे शर्यतीच्या अनुषंगाने आयोजक व प्रशासनामध्ये वाद विवाद होण्याची शक्यता आहे. तसेच सदर छकडा (बैल) गाडी शर्यती मध्ये समिल होण्याकरिता सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा या जिल्ह्यातील व आजू बाजूच्या परिसरातील बैलगाडी चालक – मालक आपआपल्या बैलगाडीसह मोठ्या प्रमाणात सामिल होण्याकरिता येणार असल्याची शक्यता असल्यामुळे तसेच शर्यतीमध्ये मोठ्या प्रमाणात बैलगाडी स्पर्धक आपआपले बैलगाडीसह सहभागी झाल्यास स्पर्धा पाहण्याकरिता मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय जमा झाल्यास सार्वजनिक शांतता भंग होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच कोविड-19 च्या अनुषंगाने परित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांचेही उल्लंघन होऊन कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणवर प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आटपाडी तालुक्यातील मौजे झरे, पिंपरी बुद्रक, विभूतवाडी, कुंरूदवाडी, पडळकरवाडी, निंबवडे,घाणंद, जांभूळणी, घरनिकीच्या स्थलसीमी हद्दीत दिनांक 20 ऑगस्ट 2021 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत अत्यावश्यक बाबी वगळता (उदा. वैद्यकीय सेवा, अंत्यविधी) या नऊ गावांमध्ये जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी संचारबंदी लागू केली आहे.
नियमांचे उल्लंघन होवून कायदेशीर कर्तव्य करणाऱ्या व्यक्तींना त्यांचे कायदेशीर कर्तव्य पार पाडण्यास अडथळा किंवा क्षती पोहोचण्यास व मानवी जिवीताला, आरोग्याला किंवा सुरक्षेला संकट निर्माण होवून सार्वजनिक शांततेचा भंग होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.आटपाडी तालुक्यातील मौजे झरे, पिंपरी बुद्रक, विभूतवाडी, कुंरूदवाडी, पडळकरवाडी, निंबवडे,घाणंद, जांभूळणी, घरनिकीच्या स्थलसीमी हद्दीत दिनांक 20 ऑगस्ट 2021 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत अत्यावश्यक बाबी वगळता (उदा. वैद्यकीय सेवा, अंत्यविधी) या नऊ गावांमध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 141 (1) अन्वये संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदी असलेल्या गावामध्ये इतर बा