‘आझाद मैदानावरील चांदणं राज्याला दिसलं पाहिजे,’ एसटी कर्मचाऱ्यांचं रात्रीच्या अंधारात फ्लॅशलाईट सुरु करुन आंदोलन

415

मुंबई : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची धग महाराष्ट्रभर परसलीय. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण तसेच अन्य मागण्यांना घेऊन हे आंदोलन सुरु आहे. मुंबईतील आझाद मैदान हे या आंदोलनाचे केंद्रबिंदू आहे. येथे शेकडो एसटी कर्मचाऱी ठाण मांडून बसले आहेत. आज (21) नोव्हेंबर या कर्मचाऱ्यांनी अनोखं आंदोलन केलं. कर्मचाऱ्यांनी आपापल्या मोबाईलचे फ्लॅशलाईट सुरु करुन रात्रीच्या अंधारातदेखील आमचा लढा चालू असल्याचा संदेश समस्त महाराष्ट्राला दिलाय.

आझाद मैदानावर शेकडे एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. यामध्ये पुरुष तसेच महिला कर्मचाऱ्यांचादेखील समावेश आहे. मागील अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला विरोधी पक्ष भाजपचा पाठिंबा असून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर तसेच माजी मंत्री सदाभाऊ खोत आझाद मैदानात कर्मचाऱ्यांसोबत मागील अनेक दिवसांपासून उपस्थित आहेत. आज या कर्मचाऱ्यांनी एक अनोखं आंदोलन केलंय. त्यांनी रात्रीच्या अंधारात मोबाईलचे फ्लॅशलाईट सुरु केले. या प्रकाशामुळे आझाद मैदानावरील शेकडो एसटी कर्मचाऱ्यांची उपस्थिती पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

यावेळी सदाभाऊ खोत आंदोलकांना मार्गदर्शन करत होते. सर्वांनी किमान दहा मिनिटे फ्लॅशलाईट सुरु करा असे आवाहन खोत करत होते. तसेच आझाद मैदानावर हे चांदणं फुललं आहे. हे चांदणं समस्त महाराष्ट्राला दिसू द्या, असे ते कर्मचाऱ्यांना सांगत होते.

दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर घणाघाती टीका केली. राज्यात मोगलाई सुरु आहे का. परिवहनमंत्र्यांच्या निलंबनाचा मुद्दा हाती घेऊ. राज्यात उद्या सरकारचं तेरावं घालणार. तसेच परवा 14 वं घालण्यातं येईल. 15 व्या दिवशी परब यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल, असं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here