
नवी दिल्लीत मंगळवारी २.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. नवी दिल्लीपासून पश्चिमेला आठ किमी अंतरावर आज रात्री साडेनऊच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला.
भूकंपाची खोली जमिनीखाली 5 किमी होती, असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले.
देशाच्या राजधानीत भूकंपाचे धक्के जाणवले.
अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.
2.5 तीव्रतेच्या भूकंपाचा केंद्रबिंदू नवी दिल्लीपासून आठ किमी पश्चिमेला होता.
काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशच्या मंडीत ४.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्याचे धक्के दिल्ली-एनसीआरमध्येही जाणवले.





