नगर दि 17 प्रतिनिधी:
शहरातील भिगार येथे प्रथे प्रमाणे आज दि 17 रोजी गणपती विसर्जन होणार आहे.याची तयारी पूर्ण झाली आहे.भिगार येथील नागरिकांना आपल्या घरातील गणपती विसर्जित करण्यासाठी जी वाहन व्यवस्था केली आहे त्या वाहनांमध्ये आपले गणपती द्यावे असे आवाहन येथील जनतेला केली असल्याची माहिती कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी दिली.तर मानाच्या देशमुख वाडा गणपतीची पूजा नगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.यंदा कोरोना मुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा असे आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने सर्व नियम काटेकोरपणे पाळण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. सध्या गणपती उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये सर्वत्र सुरू आहे .नगर शहराच्या उपनगरांमध्ये सुद्धा साजरा केला, प्रथेप्रमाणे उद्या भिंगार येथील गणपतीचे विसर्जन होणार आहे. त्या अनुषंगाने येथील पोलिस प्रशासन व कॅंटोन्मेंट बोर्डाने विशेष वाहन व्यवस्था केलेली आहे. घरगुती गणपती चे विसर्जन करण्यासाठी त्यांनी तिन स्वतंत्र अशी वाहन व्यवस्था ठेवलेली आहे, सदर वाहनांमध्ये संबंधित व्यक्तींच्या घरी जाऊन गणपती विसर्जनासाठी घेतील व त्यानंतर भिंगार येथील शुकलेश्वर मंदिराच्या जवळ गणपती विसर्जनासाठी स्वतंत्र असा तलाव केला आहे. त्यामध्ये विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.भिंगार शहरामध्ये साधारणता सत्तेचाळीस विविध मंडळांनी गणपती स्थापन केले होते, मात्र दुसरीकडे मिरवणुकीला बंदी व वाद्यांना बंदी असल्यामुळे साधेपणाने विसर्जन केले पाहिजे या अनुषंगाने आता पोलीस प्रशासनाने पावले उचललेली आहे, आजच्या विसर्जन तयारी करता स्वतंत्र अशी पोलिस प्रशासनाची बैठक सुद्धा झालेली होती, या बैठकीमध्ये विसर्जनाची पद्धत कशा पद्धतीने करायचे त्याचे नियोजन केले होते .भिंगारच्या मानाचा देशमुख वाडा गणपती मंडळाची प्रथेप्रमाणे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते पूजा होणार आहे व त्याच वाड्याच्या शेजारी गणपतीचे विसर्जन केले जाणार आहे. त्याची सुद्धा पाहणी येथील पोलिस प्रशासनाने केली आहे.उद्याच्या विसर्जनाच्या तयारी करता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी पोलीस प्रशासनाने घेतली आहे. याकरता विशेष असा पोलिस बंदोबस्त भिंगारमध्ये तैनात करण्यात आलेला आहे. शहराचे अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या आधिपत्याखाली हा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून याकरता पाच विशेष पोलिस अधिकारी तसेच शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक विलास धुमे यांच्यासह भिंगार कॅम्प ठाण्याचे पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच एस आर पी फ एक तुकडी असा पोलिस बंदोबस्त यासाठी राहणार आहे.चौकट विसर्जन मिरवणुकीला बंदी असल्यामुळे येथील पोलिस प्रशासनाने व कॅंटोन्मेंट बोर्डाने नागरिकांना आवाहन करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून विसर्जन मिरवणुकी नसल्याने गणपती विसर्जनाचे कशा पद्धतीने नियोजन केलेले आहे याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली असून ती सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सुद्धा पोलिस विभागाला दिली आहे.