आजपासून लायसन्स सोबत बाळगायची गरज नाही; जाणून घ्या नवा नियम

1208

वाहन चालवताना पोलिसांनी अडवल्यास आणि तुमच्याजवळ लायसन्स नसल्यास (सोबत आणण्यास विसरले असल्यास) आता घाबरण्याची गरज नाही.

? आजपासून लागू झालेल्या नव्या नियमानुसार वाहन चालकाला त्याचं लायसन्स, गाडीच्या देखभालीची कागदपत्रं सोबत बाळगायची गरज नाही.

? मग पुढे काय? :

▪️ वाहन चालकाचं लायसन्स आणि गाडीसंबंधीची माहिती परिवहन विभागाच्या वेबसाइटवर डिजिटल स्वरूपात अपलोड केली जाणार असून नियमभंगाबद्दलच्या दंडाची पावतीही परिवहन विभागाच्या आयटी पोर्टलवर उपलब्ध होईल.

▪️ पोलिसांनी अडवल्यास आणि तुमच्याजवळ लायसन्स तसेच गाडीची कागदपत्र नसल्यास पोलीस सदरील पोर्टलवर जाऊन तुमचं लायसन्स, देखभालीची कागदपत्रं डिजिटल स्वरूपात तपासून बघतील. ते छापील प्रतींची तुमच्याकडे मागणी करू शकत नाहीत.

? दरम्यान, तुमचा परवाना अधिकाऱ्याने रद्द केला किंवा त्यासंदर्भात इतर कारवाई केली तरीही सदरील तारखेची, ठिकाणाची, वार आणि वेळ याची नोंद या पोर्टलवर नोंदवली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here