आंतरराष्ट्रीय मानवाधिकारी राजदूत संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अल्तमश जरीवाला

816
  • आंतरराष्ट्रीय मानवाधिकारी राजदूत संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अल्तमश जरीवाला
  • ——————————————–
  • पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवावेत-अविनाश साकुंडे
  • ——————————————–
  • नगर – सर्वसामान्यांना कोणत्याही प्रकारची अडचणी येवू नये, त्यांच्या प्रश्‍नांसाठी लढा देऊन ते सोडविण्यासाठी संघटना काम करत आहेत. यामुळे नागरिकांना एकप्रकारे दिलासा मिळत असून, त्या माध्यमातून संघटनेच्या कार्यात अनेकजण जोडले जात आहेत. अल्तमश जरीवाला यांनी संघटनेच्या कार्यात दिलेल्या योगदानामुळे त्यांची संघटनेच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांसाठी काम करुन संघटनेचे काम वाढवतील. सर्वच पदाधिकार्‍यांना वरिष्ठ पातळीवरुन योग्य ते मार्गदर्शन करुन पाठबळ दिले जाईल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अविनाश साकुंडे यांनी केले.
  • आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी अल्तमश जरीवाला यांची नियुक्ती करुन संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अविनाश साकुंडे यांचे हस्ते नियुक्ति पत्र देण्यात आले. अल्तमश जरीवाला हे समाजसेवक सलीमभाई जरीवाला यांचे चिरंजीव आहेत. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस चे दिवंगत नेते हनीफभाई जरीवाला यांचे पुतणे आहेत. त्यांना समाजसेवेचा मोठा वारसा त्यांच्या कुटुंबातूनच मिळाला आहे.विद्यार्थी दशे पासून ते समाजसेवेत सक्रिय आहेत.
  • अहमदनगर युवा फाऊंडेशन च्या माध्यमातून त्यांनी तरुणांचे संघटन करून मोठे कार्य उभे केले आहे. तसेच कोरोनां काळात त्यांनी वंचित घटकांसाठी मोठी मदत केली आहे. 500 पेक्षा अधिक कुटुंबांना त्यांनी किराणा व जीवनावश्यक वस्तू पोहचवल्या आहेत. त्यांच्या या कार्याची राष्ट्रीय पातळी वर अनेक समाजसेवी संघटनांनी नोंद घेऊन त्यांना “कोरोना योद्धा” चा पुरस्कार व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आले आहे. आता मानवाधिकार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी अल्तमश जरीवाला यांची निवड झाल्याने समाजाला त्यांच्या कडून अजून आशा वाढल्या आहेत.असे सांगीतले.या वेळी राजुभाई जहागिरदार, दानिश हुंडेकरी, फज़ल कराचीवाला, आवेज़ जहागिरदार, वसिम शेख, अरबाज़ बागवान आदि उपस्थित होते. या निवडी बद्दल आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अविनाश साकुंडे, राष्ट्रीय अध्यक्ष श्याम शिंदे व प्रदेश अध्यक्ष अफसर चाँद कुरेशी यांनी शुभेच्छा दिल्या.
  • नुतन जिल्हाध्यक्ष अल्तमश जरीवाला म्हणाले, संघटनेचे जिल्ह्यात काम वाढत असून, संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या चांगल्या कामामुळे सर्वसामान्यांचे कामे मार्गी लागत आहेत. याच पद्धतीने यापुढेही काम करुन संघटनेशी अनेकांना जोडण्याचा प्रयत्न पदाच्या माध्यमातून केला जाईल. यासाठी प्रत्येक तालुक्यात संघटनेचे पदाधिकारी नेमण्यात येतील, असे सांगितले.
  • याप्रसंगी राजूभाई जहागिरदार यांनी संघटनेच्या कामकाजाची माहिती दिली. फज़ल कराचीवाला यांनी सर्वांचे आभार मानले.
  • ——-
  • आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी अल्तमश जरीवाला यांची नियुक्ती करुन संघटनेचे आंतर राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश साकुंडे यांचे हस्ते नियुक्ति पत्र देण्यात आले. यावेळी राजुभाई जहागिरदार, दानिश हुंडेकरी, फज़ल कराचीवाला, आवेज़ जहागिरदार, वसिम शेख, अरबाज़ बागवान व आदि मित्र परिवार उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here