Petrol Diesel Price : जगातील 100 हून अधिक देशांमध्ये ओमायक्रॉनचा व्हेरियंट फैलावला आहे. ओमायक्रॉनमुळे अनेक देशांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले असून लॉकडाउनची टांगती तलवार आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ उतार होत आहे. तर, भारतात इंधन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. जवळपास दीड महिन्यांपासून इंधन कंपन्यांनी आपले दर स्थिर ठेवले आहेत. आजही इंधन दरात कपात अथवा दरवाढ करण्यात आली नाही.
देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 95.41 रुपये प्रती लिटर आणि डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोलसाठी प्रति लिटर 109.98 रुपये तर डिझेलसाठी 94.14 रुपये प्रतिलिटर इतकी रक्कम मोजावी लागत आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 104.67 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर हा दर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल 104.67 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर इतका दर आहे.