सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायद्याबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. चार भिंतीच्या आत अनुसूचित जाती किंवा जमातीमधील कुठल्याही व्यक्तीविरोधात काही अपमानजनक बोलल्यास किंवा कुठलाही साक्षीदार ज्या गोष्टीबाबत नसेल, अशी घटना अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा ठरू शकत नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच याचिकाकर्त्यांविरोधात यासंदर्भात अॅट्रॉसिटींतर्गत दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याचा आदेश दिला आहे. ? हितेश वर्मा नावाच्या व्यक्तीवर घरामध्ये अपमानास्पद भाषेचा वापर केल्याचा आरोप उत्तराखंडमधील एका महिलेने केला होता. पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरोधात त्या आधारावर अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर सुनावणी करताना सांगितले की, सर्व प्रकारचा अपमान आणि धमक्यांचा अंतर्भाव अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये होत नाही. तर ज्यामध्ये पीडित व्यक्तीला समाजासमोर अपमान, शोषण आणि त्रासाचा सामना अशा घटनांचा या कायद्यामध्ये अंतर्भाव होतो. पीडित आणि आरोपींव्यतिरिक्त अन्य व्यक्तींच्या उपस्थितीत या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी गुन्हा घडणे आवश्यक आहे. ? संबंधित घटनेचे पुरावे पाहिल्यास अॅट्रोसिटी कायदा अधिनियमामधील कलम ३(१) (आर) नुसार गुन्हा घडलेला नसल्यामुळे या प्रकरणात दाखल करण्यात आलेले आरोपपत्र रद्द करण्यात येत असल्याचे सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने सांगितले. अन्य कलमांनुसार आरोपी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून खटला चालवता येऊ शकतो.
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
बीएसएफ जवान ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकला, पोलिसांनी केली अटक !
अहमदनगर :-अहमदनगर जिल्ह्यातील ससेवाडी येथील प्रकाश काळे हा सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान पाकिस्तानी महिला एजंटाच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला आहे.पंजाबमध्ये पाकिस्तान सीमेवर...
कोविड नंतरच्या फुफ्फुसांच्या नुकसानीमुळे भारतीयांना अधिक त्रास होत आहे: अभ्यास
कोविडमधून बरे झालेल्या भारतीयांना युरोपियन आणि चिनी लोकांपेक्षा फुफ्फुसाच्या कामाच्या समस्येने जास्त त्रास होतो, असे एका नवीन...
“गुंतवायचे नाही”: शरद पवार शिवसेनेच्या चिन्हावरून भांडत
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटालाच खरी 'शिवसेना' म्हणून...