अहो काय सांगता..! नर्सरीतील उंदराची शिकार करण्यासाठी केले चक्क मांजराचे अपहरण..

447

औरंगाबाद शहरातील संघर्षनगर (मुकुंदवाडी) परिसरातील प्रकार_ _मांजरे पकडणाऱ्या दोघांच्या विरोधात प्राणी क्लेश प्रतिबंध सोसायटी संघटनेच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल._ या बाबत सविस्तर माहिती अशी की, करुणाकर शामसन गंटा आणि लोकेश शिवय्या कटा नामक दोघे तरुण मुकुंदवाडी परिसरात मांजरींना मटणाचे तुकडे टाकून पकडण्याचा प्रयत्न करत होते. मटण खाण्याच्या लालसेने मांजर जवळ आले की त्यांना पकडून पिशवीत टाकण्यात येत होते. सदरील प्रकार अमोल चव्हाण यांच्या नजरेस पडला तेव्हा त्यांनी मांजरी पकडत असल्याची माहिती प्राणी क्लेश प्रतिबंध सोसायटी संघटनेचे सदस्य श्रीनिवास नंदलाल धुप्पड यांना दिली. धुप्पड यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली तेव्हा दुचाकीवरून मांजरी शोधत असलेल्या दोघांना चव्हाण व धुप्पड यांनी गाठले. विचारपूस करताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा धुप्पड यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पकडून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात आणले. त्याठिकाणी धुप्पड यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. *मांजरांची करत होते नर्सरीमध्ये विक्री* या दोघांची अधिक चौकशी केली असता त्यांनी पकडलेल्या मांजरी विविध नर्सरींमध्ये विक्री करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. या मांजरी नर्सरीतील उंदारांची शिकार करतात. त्यामुळे त्यांना नर्सरीचे मालक चांगली किंमत देतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here