
नगर – वाकड्या नजरेने पाहतो याचा राग मनात धरून ११ वीतील विद्यार्थ्याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना दि. 29 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 01:15 ते 01:30 वाजण्याच्या सुमारास न्यु आर्ट कॉमर्स ऍन्ड सायन्स कॉलेजच्या आवारात घडली आहे.याबाबत अशोक ध्यानू खाडे, वय 45 वर्षे, धंदा मजुरी, रा. शनीमंदिरा जवळ, शास्त्रीनगर, केडगाव, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की माझा मुलगा हा न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर येथे शिक्षण घेत असून त्याला कॉलेज मधील एका (रा. सिध्दार्थनगर, अहिल्यानग्र) मुलाने इतर साथीदारांसह वाकड्या नजरेने पाहातो याचा राग मनात धरुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन, त्याच्या अंगावर बसुन गळा आवळुन व बुक्कीने तसेच त्याचे हातातील धातूच्या कड्याने गळ्यावर मारुन त्यास गंभीर जखर्मी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणे अंमलदार सपोनि गणेश वारूळे हे करत आहेत.