अहिल्यानग्र एमआयडीसीतील कंपनीच्या गेटवर कंत्राटदारासह मॅनेजरला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी

    11

    अहिल्यानगर-कामावरून काढून टाकल्याच्या रागातून एका तरूणाने आपल्या चार साथीदारांसह कंपनीच्या गेटमध्ये घुसून कंत्राटदार आणि मॅनेजर लाथाबुक्क्यांनी मारहाण करत कोयत्याने हातपाय तोडून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नागापूर एमआयडीसी भागात रविवारी (18 जानेवारी) दुपारी तीनच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    नवनाथ अर्जुन उदमले (रा. हिवरेझरे, ता. अहिल्यानगर) नानगर) व अनोळखी चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिक निनाद श्रीहारी टीपुगडे (वय 35, रा. नागापूर, एमआयडीसी) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची नागापूर एमआयडीसीत सिध्दी फोर्ज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. नवनाथ उदमले याला कंपनीने कामावरून काढून टाकले होते. याच कारणाचा राग मनात धरून रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास संशयित आरोपीने आपल्या चार अनोळखी साथीदारांसह कंपनीचे गेट गाठले. कंपनीच्या आवारात बेकायदेशीर प्रवेश करून फिर्यादी निनाद टीपुगडे, कंत्राटदार सदाशिव कुलकर्णी आणि प्रोडक्शन मॅनेजर राजेंद्र जाधव यांना शिवीगाळ केली. वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. आरोपींनी या तिघांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नवनाथ उदमले याने सोबत आणलेल्या कोयत्याचा धाक दाखवत तुमचे हातपाय तोडून तुम्हाला जिवे ठार मारौ अशी धमकी दिली. औद्योगिक वसाहतीमध्ये भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

    या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी नवनाथ उदमले आणि त्याच्या चार साथीदारांविरूध्द गुन्हा नोंदवला आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार टेमकर करत आहेत. दरम्यान, एमआयडीसी परिसरात चोऱ्या, हाणामारी, खंडणीचे प्रकार वाढत चालले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी व्यावसायिकांकडून होत आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here