अहिल्यानगर शहरात बनावट कागदपत्रांद्वारे जमीन व्यवहार, डॉक्टरची जवळ जवळ 15 कोटींची फसवणूक….

    67

    जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात बनावट कागदपत्रे, खोटे मालक उभे करून आणि बनावट सह्यांच्या आधारे सावेडी येथील डॉक्टरची तब्बल 14 कोटी 66 लाख 51 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

    याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात 30 जणांच्या टोळीविरोधात कटकारस्थान रचून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर 2017 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत निंबळक (ता. नगर) गावच्या शिवारात घडला आहे.

    याबाबत डॉ. अनिल आठरे पाटील (वय 73, रा. झोपडी कॅन्टीन समोर, आठरे पाटील हॉस्पीटल, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य संशयित आरोपी भाजपाचा माजी नगरसेवक स्वप्नील शिंदे, अमोल जाधव आणि त्यांच्या इतर साथीदारांनी संगनमत करून हा कट रचला.

    संशयित आरोपींनी डॉ. आठरे यांच्या जमीन खरेदी-विक्रीच्या वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये पत्ता माहित नाही), दत्तु सस्ते, श्रीकांत आल्हाट, रॉकी कांबळे, सुनिल देसाई, अनिल देसाई, सुमन देसाई, ज्योती कांबळे, प्रशांत गायकवाड, महेश कुन्हे, अरूण खरात, गणेश तकडे, गणेश साबळे, लखण भोसले, विजय वैरागर, भारत फुलमाळी, रामा पवार, प्रेमचंद होनचंद कांबळे, वैशाली स्वामी, मिनल स्वामी, सुनिल वैरागर, संतोष कदम, साजीद शेख, संजय आल्हाट, सचिन शिंदे आणि इतर अनोळखी साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here