
अहिल्यानगर – अहिल्यानगर शहराला खाद्यसंस्कृतीचा मोठा वारसा लाभलेला आहे. शहरातील अनेक विविध हॉटेल्सनी ग्राहकांसाठी नवनवीन पदार्थांच्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शहराच्या या खाद्य संस्कृतीचा दर्जा चांगला असावा, ग्राहकांना निर्जंतुक वातावरणात सुविधा मिळावी, या उद्देशाने महानगरपालिका व हायजिन फर्स्टच्या माध्यमातून स्वच्छ व निर्जंतुक खाद्यसंस्कृती उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत ७डिसेंबरपासून शहरातील विविध हॉटेल व खाद्य पदार्थ विक्रेत्या आस्थापनांना भेटी देऊन तेथील स्वच्छतेची पाहणी केली जाणार आहे. सर्व व्यावसायिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.
या उपक्रमाच्या नियोजनासाठी आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत महापालिकेत बैठक घेण्यात आली. यावेळी हायजिन फर फर्स्टच्या वैशाली गांधी, आरती थोरात, महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. शहरातील ग्राहकांना निर्जंतूक अन्न मिळावे या उद्देशाने हाजिन फर्स्ट ही संस्था कार्यरत आहे. शहरातील प्रत्येक हॉटेल हातगाड़ी, बेकरी, मिठाई येथील स्वयंपाकगृह हे स्वच्छ व निर्जंतूक असावे, व्यवसायिकांनी स्वच्छतेचे प्राथमिक नियमांचे पालन करावे या उद्देशाने अहिल्यानगर महानगरपालिका व हायजिन फर्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सर्व हॉटेल्सच्या भेटी घेवून पाण्याच्या टाकीपासून कर्मचा-यांच्या वैयक्तिक स्वच्छतेची पाहणी करून अंमलबजावणी करून घेतली जाईल. यामुळे ग्राहकांना सुरक्षित स्वच्छ वातावरणात अन्न पदार्थ मिळेल. असे वैशाली गांधी यांनी सांगितले.





