अहिल्यानगर येथे पोलिसासाठी दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता अटकेत, सहाय्यक फौजदार राजेंद्र प्रभाकर गर्गे यांच्यासाठी स्वीकारली दीड लाख रुपयांची लाच

    82

    कोतवाली पोलिस ठाण्यातील सहाय्यकफौजदार राजेंद्र प्रभाकर गर्गे यांच्या वतीने दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक रामचंद्र गायकवाड (वय 71, रा. सावेडी) यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले. गांजा बाळगल्याच्या गुन्ह्यात एका व्यक्तीस आरोपी न करता साक्षीदार करण्यासाठी सुरुवातीला पाच लाखांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर ही रक्कम दीड लाखांवर आली. तक्रारदाराने नाशिकच्या लाचलुचपत पथकाशी संपर्क साधला. त्यानुसार 21 ऑगस्ट रोजी रात्री सापळा रचण्यात आला. यात गायकवाड यांनी ही लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या कारवाईत सापळा अधिकारी श्रीमती नेहा तुषार सूर्यवंशी, तपास अधिकारी अजित त्रिपुटे, पोलीस हवालदार विनोद चौधरी, चालक हवालदार विनोद पवार व पोलीस कॉन्स्टेबल अनिल गांगोडे यांच्या पथकाने सहभाग घेतला. गायकवाड हे राजकारणातील जुने खेळाडू असून त्यांनी रिपब्लिकन पक्ष, रामदास आठवले यांचा पक्ष, तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यामध्ये काम केले आहे. अलीकडेच ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. नगरमध्ये उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्यात त्यांचा पुढाकार होता. आक्रमक बहुजन नेते म्हणून त्यांची ओळख होती; परंतु पोलिसासाठी मध्यस्थी करताना लाच स्वीकारल्याने त्यांची प्रतिमा धुळीस मिळाली आहे.

    दरम्यान, लाच प्रकरणात अडकलेले सहाय्यक फौजदार राजेंद्र गर्गे पुढील महिन्यात सेवानिवृत्त होणार होते. सेवानिवृत्तीपूर्वी “वरची कमाई” करण्याच्या घाईत त्यांनी मोठा हात मारण्याचा प्रयत्न केला, मात्र सापळ्यात सापडल्याची चर्चा कोतवाली पोलिसठाण्यात जोरात आदे

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here