अहिल्यानगर महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; ११ नोव्हेंबरला प्रभागनिहाय आरक्षण सोडत; या तारखे नंतर केव्हाही निवडणुकीचा बिगुल

    44

    अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता काही दिवसांवर आली. महानगरपालिकेने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून ११ नोव्हेंबर रोजी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. यानंतर २ डिसेंबरनंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे.

    महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्यानंतर ८ नोव्हेंबर २०२५ रोजी आरक्षण सोडतीची जाहिर सूचना वृत्तपत्रात प्रसिद्ध होईल.अंतिम मुदत २४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ठेवण्यात आली आहे.

    महापालिका आयुक्तांकडून या सर्व हरकतींचा विचार करून अंतिम निर्णय घेण्यात येणार असून, २ डिसेंबर २०२५ रोजी राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध होईल.

    या प्रक्रियेनंतर कोणत्याही वेळी निवडणुकीची औपचारिक घोषणा होऊ शकते. त्यामुळे राजकीय पक्ष, कार्यकर्ते आणि संभाव्य उमेदवारांमध्ये निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली आहे. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक ही या वर्षातील सर्वात लक्षवेधी निवडणुकांपैकी एक ठरणार असल्याचे संकेत राजकीय वर्तुळात मिळत आहेत.

    ११ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रत्यक्ष आरक्षण सोडत काढून, त्याचा निकाल राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर केला जाईल. त्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी प्रारूप आरक्षण जाहीर करून हरकती व सूचना मागविण्यात येतील. या हरकती व सूचना सादर करण्याची

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here