अहिल्यानगर महानगरपालिकेत आता 6 स्वीकृत सदस्य

    18

    अहिल्यानगर – महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली आहे. त्यातून 68 नगरसेवक महानगरपालिकेच्या सभागृहात दिसणार आहेत. तसेच, महासभेकडून 6 स्वीकृत सदस्यही निवडले जाणार आहेत. यापूर्वी महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची संख्या 5 होती. मात्र, 2023 मध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात करण्यात आलेल्या नव्या तरतुदीमुळे स्वीकृत सदस्य संख्या एकने वाढली असल्याची असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली. दरम्यान, महापौर पदासाठी अद्याप राज्य शासनाकडून् आरक्षण निश्चिती करण्यात आलेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

    सार्वत्रिक निवडणुकीनंतर स्वीकृत सदस्यांची निवड केली जाते. महाराष्ट्र शासनाने राजपत्र प्रसिद्ध करून अधिनियमात तरतूद केली आहे. या नवीन तरतुदीनुसार एकूण सदस्य संख्येच्या 10 टक्के किंवा जास्तीत जास्त 10 स्वीकृत सदस्य यापैकी जी संख्या कमी असेल, तीं गृहीत धरता येते. महानगरपालिकेत 68 सदस्य असल्यामुळे 10 टक्के म्हणजे 6.8 संख्या येते. त्यामुळे आता सभागृहात 6 स्वीकृत सदस्य असणार आहेत. महापौर पदासाठी अद्याप आरक्षण सोडत काढण्यात आलेली नाही. आरक्षण निश्चितीनंतर आधी महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक होईल. त्यानंतर स्थायी समिती सभापती, महिला बालकल्याण समिती सभापती व उपसभापती, सभागृह नेता, विरोधी पक्ष नेता या निवडी केल्या जाणार आहेत. स्वीकृत सदस्य निवडही महापौर निवडणुकीनंतरच होणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here