अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक; आयुक्त घेणार सोमवारी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक

    36

    अहिल्यानगर – राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमाची, मतदान व मतमोजणी प्रक्रियेची, निवडणुकीसंदर्भात उपलब्ध सुविधा, कक्ष, समित्या आदींची माहिती राजकीय पक्षांना देण्यात येणार आहे. व्याप्ती येत्या सोमवारी (२२ डिसेंबर) महानगरपालिकेत सर्व राजकीय पक्षाच्या शहराध्यक्षांची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

    अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. १ ते १७ च्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगाने जाहिर केलेला आहे. निवडणुक कार्यक्रमानुसार १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया व १६ जानेवारी रोजी मतमोजणी निश्चीत करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेची निवडणुकीसंदर्भात राजकीय पक्षांना माहिती होण्याच्या दृष्टीने या बैठकीचे आयोजन करणत आलेले आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षाच्या शहर अध्यक्षांनी सौमवारी २२ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता आयुक्त सभा कक्ष येथे बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here