अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती

    31

    अहिल्यानगर – अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम १४ अन्वये अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रासाठी दिनांक १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ ते १७ मध्ये विभागून प्रभागनिहाय छापून घेत अधिप्रमाणित केलेली आहे. सदर मतदार याद्या आज गुरुवार दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना माहितीसाठी मुख्य प्रशासकीय कार्यालय व महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. अहिल्यानगर महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.amc.gov.in येथे फोटो विरहित मतदार यादी निःशुल्क पहाणेसाठी उपलब्ध आहे. सदरच्या मतदार यादीबाबत हरकती / सूचना असल्यास त्या लेखी स्वरुप दिनांक २० नोव्हेंबर २०२५ ते दि. २७ नोव्हेंबर २०२५ अखेर कार्यालयीन वेळेत अहिल्यानगर महानगरपालिका मुख्य कार्यालय (नविन प्रशासकीय इमारत), प्रभाग समिती कार्यालय क्र. १ सावेडी, प्रभाग समिती कार्यालय क्र. २ शहर, प्रभाग समिती कार्यालय क्र. ३ झेंडीगेट, प्रभाग समिती कार्यालय क्र.४ बुरुडगाव या ठिकाणी स्विकारण्यात येतील. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकती / सुचनांचा विचार केला जाणार नाही.

    विधानसभेची मतदार यादी महानगरपालिकांच्या प्रभागानुसार विभागून ती ती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता तयार करणे व अधिका-यांनी अधिसूचित करणे या प्रयोजनासाठी दि. १ जुलै, २०२५ हा दिनांक अधिसूचित केला असून, या दिनांकास अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करून अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीकरीता प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. असे करीत असताना सदर मतदार यादीमध्ये मूळ विधानसभा मतदार यादीत नसलेली कोणतीही नवीन नावे समाविष्ट करण्याचे अथवा मूळ विधानसभा मतदार यादीत असलेली नावे वगळण्याचे; तसेच त्यामध्ये कोणत्याही दुरुस्त्या करण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगास किंवा राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीकरिता प्राधिकृत केलेल्या अधिका-यास नाही.

    माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १ ते १७ करीता तयार करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादींबाबत काही हरकती व सूचना दाखल करावयाच्या असतील अशा मतदारांनी नमुना अ मध्ये आणि तक्रारदारांनी नमुना ब मध्ये (नमूना ‘अ’ व ‘ब’ महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेले आहेत.), उपरोक्त विहीत कालावधीत हरकती व सूचना दाखल कराव्यात. प्राप्त होणा-या हरकती व सुचनांवर १) लेखनिकांच्या काही चुका, २) दुस-या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झालेले, ३) संबंधित प्रभागातील विधानसभा मतदार यादीत मतदारांची नावे असूनही महानगरपालिकेच्या संबंधित प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नावे वगळण्यात आली असल्यास अशा मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे, ४) मृत व्यक्तींची नावे आढळल्यास किंवा त्याबाबत हरकती किंवा सूचना प्राप्त झाल्यास अशा सुधारणा / दुरूस्ती करता येतील.

    अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १ ते १७ करीता तयार करण्यात आलेल्या फोटोसहीत प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या माननीय राज्य निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार प्रति पृष्ठ रु. २/- याप्रमाणे अहिल्यानगर महानगरपालिका येथे विक्रीस उपलब्ध आहेत.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here