अहिल्यानगर मनपा निवडणुक; प्रभाग क्रमांक 1 मधील रामदास वाणी हे जायंट किलर ठरणार -अभिषेक कळमकर

    22

    रिव्हॉल्वरचा धाक दाखवूनही महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचारात झंझावात प्रभाग 1 मध्ये प्रचार रॅली काढून भयमुक्तीचा नारा

    दहशत करणारे सत्ताधारी उमेद‌वारांसाठी वाणी हे जायंट किलर ठरणार -अभिषेक कळमकर

    अहिल्यानगर – महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1 मधील उमेदवाराच्या घराबाहेर बसून, रिव्हॉल्वरचा धाक दाखवण्याचा प्रकार समोर आलेला असताना, बुधवारी त्या प्रभागातील उमेदवारांना बरोबर घेऊन महाविकास आघाडीच्या वतीने प्रचार रॅली काढण्यात आली.

    तर रॅलीद्वारे भयमुक्तीचा नारा देण्यात आला. प्रभाग 1 मधील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार थोरात ऋषीकेश लक्ष्मण (अ), हालदार संस्कृती किशोरकुमार (क) व वाणी रामदास विठ्ठल (ड) यांच्या प्रचारार्थ तपोवन रोड, कादंबरीनगर परिसरातून प्रचार रॅली काढली. यामध्ये शहराध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष निलेश मालपाणी, माजी नगरसेवक संजय झिंजे, वेणूबाई वाणी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

    महापारया प्रभागातील महाविकास आघाडीचे उमेदवार रामदास विठ्ठल वाणी हे सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहेत. पहिल्यांदाच निवडणूक लढवत असतानाही वाणी यांच्यावर दहशतीने दडपशाही करण्याचा प्रकार समोर आलेला असताना, महाविकास आघाडीच्या चांगल्या प्रतिमेच्या उमेदवारांमुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र आहे. ते निवडणूक रिंगणात उतर्यापासून रामदास वाणी यांच्यासह इतर उमेदवारांवर देखील दबाव आणण्याचे प्रकार सुरू झाले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

    दोन दिवसांपूर्वी वाणी यांना रिव्हॉल्वर दाखवून धमकावण्याचा प्रकार घडल्याची गंभीर घटना समोर आली आहे. मात्र अशा कोणत्याही दहशतीला न जुमानता रामदास वाणी यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. रामदास वाणी हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले उमेदवार असून गेल्या चार वर्षांपासून महाविकास आघाडीच्या माध्यमातून सातत्याने जनसेवेत कार्यरत आहेत. त्यांची आई ज्येष्ठ समाजसेविका असून वाणी कुटुंबाची सामाजिक कार्याची परंपरा आहे. अशा सर्वसामान्य उमेदवाराला सत्ताधारी गटाकडून धाक दाखवण्यात आल्याचा निषेध नोंदविण्यात आला. दहशतीला न जुमानता जनतेच्या सेवेसाठी लढा सुरूच राहणार असल्याची भावना शहराध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी व्यक्त केली. तर दहशत करणारे सत्ताधारी उमेदवारांसाठी वाणी हे जायंट किलर ठरणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here