अहिल्यानगर मनपा निवडणुक वंचितकडून 216 इच्छुक; वैचितकडून ‘महानगर विकास आघाडी’चा तिसरा पर्याय

    35

    अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तब्बल 216 इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडून उमेदवारी अर्ज घेऊन तयारी दर्शविली आहे. यामध्ये काही विद्यमान तसेच माजी नगरसेवकांचाही समावेश असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष योगेश साठे, शहराध्यक्ष हनिफ शेख आणि युवा शहराध्यक्ष योगेश गुंजाळ यांनी दिली आहे.

    अनेक आजी-माजी नगरसेवक सध्या विविध पर्यायांचा विचार करत आहेत. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी मिळवण्यासाठी सत्ताधारी व माजी नगरसेवक मोठ्या संख्येने संपर्कात असल्याचा दावा पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. या नगरसेवकांशी अंतिम टप्प्यातील बोलणी देखील पूर्ण झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या आजी-माजी नगरसेवकांचा वंचित बहुजन आघाडीचे पक्षप्रमुख, माजी खासदार प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला जाणार आहे. त्यानंतर संबंधित उमेदवारांचे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेजाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

    यासोबतच, आगामी मनपा निवडणुकीत समविचारी पक्ष व विविध संघटनांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली ‘महानगर विकास आघाडी’ स्थापन करण्यात येणार आहे. ही आघाडी सत्ताधारी व विरोधकांपुढे तिसरा सक्षम पर्याय म्हणून उभी राहणार असल्याचा दावा पक्षाच्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आला आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here