
यशस्वी प्रशिक्षकांची नावे पुढीलप्रमाणे —
आदित्य क्षीरसागर, साहील सय्यद, सबील सय्यद, सूरज गुंजाळ, सर्फराज सय्यद, आशिष केदारी, अदिती होले, संस्कृती चव्हाण, विशाल भंडारी, सुजित हजारे आणि ओम वाघ.
या यशस्वी प्रशिक्षकांना कराटे इंडिया ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष हांशी भारत शर्मा यांच्या हस्ते प्रमाणपत्र, अधिकृत बॅच व टाय प्रदान करून गौरविण्यात आले. हा क्षण प्रशिक्षकांसाठी अत्यंत अभिमानास्पद ठरला.या गौरव समारंभप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, कराटे डू असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष सल्लाऊद्दीन अन्सारी, उपाध्यक्ष परमजितसिंग आणि सचिव संदीप गाडे हे मान्यवर विशेष उपस्थित होते.
त्यांनी प्रशिक्षकांचे कौतुक करत सांगितले की, “ही परीक्षा केवळ पात्रता नव्हे, तर ती एक शिस्त, नैतिकता, आणि कराटेच्या मूलभूत तत्त्वांवर आधारित परीक्षा आहे.”या यशामुळे अहिल्यानगरमध्ये आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण असून, स्थानिक पातळीवर विविध ठिकाणी प्रशिक्षकांचे स्वागत करण्यात येत आहे. या प्रशिक्षकांचे यश भविष्यात नव्या पिढीतील कराटेकांना प्रेरणा देणारे ठरणार आहे.