
शेअर मार्केटच्या नावाखाली ६२ लाख ८० हजार रुपयांचा गंडा घालणा-या आरोपीवर गुन्हा दाखल होताच शेवगाव पोलीसांनी आरोपीला केले गजाआड. !!!
दिनांक- ०१/०८/२०२५ या बाबत सविस्तर वृत्त असे की गहिनीनाथ पंढरीनाथ कातकडे वय-५८ वर्षे, धंदा- शेती रा. ठाकुल निमगाव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन शेअर मार्केट ट्रेडिंग कंपणी नामे-श्री विठ्ठल संपर्क कार्यालय नावाचे शेअर मार्केट ट्रेडींग कंपनी या नावाने आखेगाव रोड शेवगाव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर येथे कंपनीच्या नावाखाली लाखो रुपयांची फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करुन फसवणुक झाल्याचे फिर्यादीत नमुद केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं-६६७/२०२५ भादवि कलम ४२०,४०९,४०६ महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियम, १९९९ चे कलम-३ प्रमाणे दिनांक-३१/०७/२०२५ गुन्हा दाखल करण्यात आला होता.मा. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, नमुद गुन्ह्यातील आरोपी नामे गणेश बप्पासाहेब डोंगरे वय-४० रा. काटे वस्ती आखेगाव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर हा त्याचे रहाते घराच्या पाठीमागील रुममध्ये झोपलेला आहे. अशी गुप्त माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दोन पोलीस पथक तयार करुन त्यांचा शोध घेणेकामी रवाना करण्यात आले होते. नमुद गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असतांना आरोपी हा त्याचे राहते घराच्या पाठीमागील रुममध्ये झोपलेला असताना त्याला पोलीसांची चाहुल लागताच पळुन जात असतांना पोलीस पथकाने त्याचा शिताफिने पाठलाग करुन त्यास पकडून दि. ०१/०८/२०२५ रोजी पहाटे ताब्यात घेवुन आरोपीला शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणुन नमुद गुन्ह्यात अटक करुन मा. न्यायालया समोर हजर केले आहे. वरिल आरोपी विरुध्द इतर कोणीही व्यथीत अगर बळीत अशा जनतेची फसवणुक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोस्टेला बिनधास्तपणे संपर्क साधावा असे याव्दारे आवाहन करण्यात येत आहे. सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री सोमनाथ घार्गे सो अहिल्यानगर, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. वैभव कलुबर्मे अहिल्यानगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिल पाटील उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शना खाली
पो.नि. श्री संतोष मुटकुळे सो, पोसई बाजीराव सानप, पोहेकों किशोर काळे, पोकों शाम गुंजाळ, पोकों भगवान सानप, पोकों ईश्वर बेरड, पोकों राजु बढे, पोकों सचिन पिरगळ, पोकों एकनाथ गर्कळ, पोकों प्रशांत आंधळे व नगर दक्षिण सायबर सेलचे पोकों राहुल गुड्डु यांनी केली असुन वरील गुन्ह्यांचा पुढील तपास पोसई बाजीराव सानप हे करत आहेत





