अहमदाबाद बॉम्बस्फोटप्रकरणी 38 जणांना फाशी, 11 जणांना जन्मठेप..

448
  • गुजरातमधील अहमदाबाद येथे 2008 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष न्यायालयाने 38 जणांना फाशीची शिक्षा सुनावली. तसेच इतर 11 जणांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा केली.
  • बॉम्बस्फोटातील मृताच्या वारसांना एक लाख रुपये, गंभीर जखमींना 50 हजार, तर किरकोळ जखमींना 25 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला..
  • *70 मिनिटांत 21 बॉम्बस्फोट*
  • अहमदाबादमधील मणिनगरमध्ये 26 जुलै 2008 रोजी संध्याकाळी पावणेसात वाजता पहिला बॉम्बस्फोट झाला. नंतर 70 मिनिटांत आणखी 20 बॉम्बस्फोट झाले. त्यात 56 जणांचा मृत्यू, तर 200 हून अधिक जण जखमी झाले होते. 2002 मधील गोध्रा दंगलीचा बदला घेण्यासाठी ‘इंडियन मुजाहिद्दीन’ने हे बॉम्बस्फोट घडविले होते.
  • विशेष न्यायालयात तब्बल 13 वर्षे हा खटला चालला. विशेष न्यायालयाने 8 फेब्रुवारी रोजी 49 आरोपींना दोषी ठरवलं, तर 28 जणांची निर्दोष मुक्तता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here