अहमदनगर-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात घडला आहे. अहमदनगर-सोलापूर रस्त्यावर कोकणगाव गावच्या शिवारात बोराडे वस्ती जवळ चार वाहनांमध्ये भीषण अपघात झाला आहे. या विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातांमध्ये मालवाहतूक ट्रक हा सोलापूर कडून अहमदनगरकडे जात होता, तर इतर तीन वाहने तीन चाकी अॅपे रिक्षा, क्रुझर कंपनीची जीप आणि टू व्हिलर गाडी ही मिरजगावच्या दिशेने सोलापूरकडे जात होते.या अपघातात कृष्णा मल्हारी बोरुडे आणि सोपान दिनकर काळे या दोघांचा मृत्यू झाला आहे.तर इतर दहा जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत सर्वांना नगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.अहमदनगर- सोलापूर महामार्गावरील कोकणगाव शिवारात काल रात्री 11 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाही. दरम्यान जखमींमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. आठ जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात तर सात जणांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत कर्जत पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत कर्जत पोलीस तपास करत असल्याचे कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले आहे.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
नगरमध्ये ६ वर्षीय बालकावर पाळीव कुत्र्याचा जिवघेणा हल्ला
नगरमध्ये ६ वर्षीय बालकावर पाळीव कुत्र्याचा जिवघेणा हल्ला
‘नवीन संसदेची गरज होती’: अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने उद्घाटन टाळले
देशाची लोकसंख्या लक्षात घेऊन संसदेच्या नव्या इमारतीची गरज असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोमवारी...
कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार; जाणून घ्या पेट्रोल, डिझेलचे आजचे दर
Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मागील काही दिवसांपासून चढ-उतार सुरू आहे. कच्चा तेलाची मागणी वाढल्यामुळे किंमतीतही वाढ...
कर्नाटक-महाराष्ट्र पंक्ती: बेळगावी किल्ला बनला, सीमेवर ३०० थांबले
61 हून अधिक संघटनांनी निदर्शने करण्याची परवानगी मागितली होती. (फाइल)
५बेळगावी, कर्नाटक: कर्नाटकातील बी.एस....





