पवार तांडा येथील घटना…
पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल…
पवन नगर येथील रहिवासी विक्रांत कर्पे, वय २९ यांच्या कडे त्यांची आई ऊर्मिला कर्पे यांच्या नावे भारत गॅस ची एजन्सी असून ते नगरमधील जाम कौडगाव या ठिकाणी स्वराज माझदा या टेम्पोतून गॅस टाक्यांचा पुरवठा करतात. विक्रांत कर्पे आणि टेम्पोचालक अतुल खडसे हे गॅस डिलिव्हरी करण्यासाठी गेले होते. पवार तांडा या ठिकाणी गॅस डिलिव्हरी साठी थांबले असता किरण ठोंबे या इसमाच्या भावाने अगदी शुल्लक कारणावरून अर्वाच्य भाषेत शिविगाळ करण्यास सुरुवात केली. आजूबाजूच्या नागरिकांनी मध्यस्थी करून हे भांडण सोडवले. त्यानंतर कर्पे टेम्पो घेऊन पुढील गॅस डिलिव्हरीसाठी गेले. पुन्हा घरी येत असताना रतडगाव मधील खांडके शिवारात, पवार तांड्याजवळ किरण ठोंबे, शुभम ठोंबे, शालमन ठोंबे, राहूल ठोंबे, साहिल ठोंबे, गणेश ठोंबे, आदिका ठोंबे सर्व राहणार खांडके शिवार,या सर्वानी टेम्पोला आडवे येऊन कर्पे आणि टेम्पोचालक यांना शिविगाळ करायला सुरुवात केली. तसेच टेम्पोचे नुकसान ही केले. कर्पे यांना मारहाण करून पैशांची बॅग ही पळवली. तसेच टेम्पोमधील काही भरलेल्या गॅस टाक्या ही जबरदस्ती ने पळवल्या कर्पे यांची आई भांडण सोडवायला मधे पडली असता, त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून त्यांना ही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गॅस टाक्या, मंगळसूत्र आणि रोख रक्कम असे सर्व मिळून १लाख २५ हजार ५७६ रूपयांचा मुद्देमाल ओरबाडून नेलाय. कर्पे यांनी वरील सर्व आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. तरी या प्रकरणी योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी कर्पे यांनी केलीय.
अहमदनगर