
अहमदनगर : लखन घोरपडे यांना बेदम मारहाण उपचारादरम्यान मृत्यू
तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अहमदनगर दि. २६ रोजी सायंकाळच्या सुमारास लखन घोरपडे याला सिद्धार्थ नगर येथे तीन अनोळखी युवकांनी बेदम मारहाण केली या प्रकरणाची तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद देखील दाखल करण्यात आली परंतु लखन घोरपडे हे मारहाणी मध्ये गंभीर जखमी झाले लखन घोरपडे यांना उपचारासाठी सुरुवातीला जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते परंतु प्रकृती खराब होत असल्याने पुणे येथे ससून हॉस्पिटलला हलविण्यात आले होते पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये लखन घोरपडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला सदर घटनाही तोकाला पोलीस ठाण्यात दाखल असून दोन आरोपी अटक केल्या असून एक आरोपी फरार आहे पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे करत आहे





