उद्या दि.१३/०४/२०२१ रोजी झेंडी गेट’ रामचंद्र खुंट’ हातमपुरा’ रामचंद्र खुंट’, मंगलगेट, सर्जेपुरा, कचेरी परिसर, कोठला’ माळीवाडा’ इ . भागासह उपनगर भागास उशीराने व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

873




अहमदनगर:- आज दि. १२/०४/२०२१ रोजी सायंकाळी अहमदनगर शहर पाणी योजनेच्या मुळानगर पंपींग स्टेशन येथील विज वितरण कंपनी कडून होणारा विज पुरवठा सायंकाळी ५.३० वाजले पासून ५.४५ पर्यंत खंडित झालेला होता. परंतु विज पुरवठा सुरू झाल्यानंतर मुळानगर पंपींग स्टेशन येथे तांत्रिक बिघाड निर्माण झालेला होता. सदरचे दुरूस्तीचे काम रात्री ७.३० वाजता पुर्ण करून बंद पडलेला पाणी उपसा टप्या-टप्याने सुरु करण्यात येत आहे. परंतु पुर्ण क्षमतेने पाणी उपसा पुर्ववत होण्यास किमान तीन ते चार तासांचा अवधी लागणार आहे.त्यामुळे आज सायंकाळी पाणी वाटपाच्या उपनगर भागास पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही.तसेच शहर पाणी वितरणाच्या टाक्या निर्धारित वेळेत भरणे शक्य होणार नाही.त्यामुळे उद्या मंगळवार दि.१३/०४/२०२१ रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास उदा . झेंडी गेट’ रामचंद्र खुंट’ हातमपुरा’ रामचंद्र खुंट’, मंगलगेट, सर्जेपुरा, कचेरी परिसर, कोठला’ माळीवाडा’ इ . भागासह उपनगर भागास उशीराने व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.तरी वरिल सर्व परिस्थीती विचारात घेवुन नागरिकांनी असलेल्या पाण्याचा वापर कारकसरिने करावा व महानगर पालिकेस सहकार्य करावे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here