अहमदनगर शहराला लागलेली खड्यांचे शहर हे कलंक अहमदनगर महापालिका कधी पुसून काडणार:- अलतमश जरीवाला

670

अहमदनगर :

सध्या पूर्ण अहमदनगर शहरात खड्डे पडलेली आहेत, शहरात एक ही रास्ता असे राहिलेली नाही की जिथे खड्डे नाही. अहमदनगर शहराला लागलेली खड्यांचे शहर हे कलंक अहमदनगर महापालिका कधी पुसून काडणार असा सवाल आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनाचे जिल्हाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ता अलतमश सलीम जरीवाला यांनी उपस्तिथ केला आहे.
बुधवार दिनांक 01/09/2021 रोजी अहमदनगर महानगरपालिका येते धरती चौक ते पारशाहखुंट या भागातील रस्त्याची झालेली दुर्दशा संदर्भात अलतमश जरीवाला यांनी अहमदनगरचे महापौर मा. रोहिणीताई शेंडगे, महापालिकाचे उपायुक्त श्री पठारे साहेब व महापालिकाचे शहर अभियंता श्री सुरेश इथापे साहेब यांना समक्ष भेटून रसत्याला मुरुम व खडीकरणानी (डब्लू.बी.एम) दुरुस्ती करण्याबाबत मागणी करण्यात आली, यावेळी निवेदनात जरीवाला यांनी म्हटले आहे की अहमदनगर शहरला लागलेली खड्यांचे कलंक अहमदनगर महापालिका कधी पुसणार, तसेच धरती चौक ते पारशाहखुट चौक हा मुख्य रस्ता असल्याने सदर रस्ता हा मुख्य बाजारपेठेत जात असल्यामुळे ग्रामीण भागातून येणाया या सर्वसामान्य व जेष्ठ नागरिकांची नेहमी वर्दळ असते. तसेच शाळकरी मुले-मुली व जेष्ठ नागरिकांची या रस्त्यावर वापर होत असल्याने सदर रस्त्यामध्ये मोठ-मोठे खड्डे पडल्यामुळे व त्यात पावसाचे पाणी साचल्याने खड्यांचे अंदाज येत नाही. त्यामुळे बराच वेळेस छोटे-मोठे अपघात झाले आहे.
तरी आपणांस विनंती करतो की, वर नमूद केलेल्या रसत्याचे मुरुम व खडीकरण (डब्लू.बी.एम) करावे. सदर डांबरीकरण करण्यास मंजूरी मिळाली आहे व पावसाळा संपताच रसत्याचे काम लवकरात लवकर सुरु पूर्ण करावे. जेणेकरून भविष्यात होणाऱ्या अपघाताला आळा बसेल व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल. यावेळी सर्वांच्या समाधान उत्तरे मिळाली व यावर लवकरच ठोस उपाय योजना करून संबधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन २ ते ३ दिवसात अंमलबजावनी करण्यात येतील असे महापौर व शहर अभियंता यांच्या वतीने सांगण्यात आले, यावेळी आवेज जहागिरदार, शुभम मिरांडे, फ़ैयाज़ तांबोळी, फ़ज़ल शेख व आधी उपस्तिथ होते. तसेच आज बुधवार रोजी होणारी महासभा मध्ये धरती चौक ते पारशाहखुंट रस्त्याचे डांबरीकरण करण्या संदर्भात सभे मध्ये या रस्त्याचे विषय आपण घ्यावा अशी ही मागणी सामाजिक कार्यकर्ता अलतमश जरीवाला यांच्या वतीने करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here