अहमदनगर शहरात ६४ रुग्ण ही संख्या चुकून नोंदविली गेली असून अहमदनगर शहरात आज फक्त ०५ रुग्णांची नोंद झाली आहे.तरी अहमदनगर शहरातील नागरिकांनी काळजी करू नये असे अवाहन अहमदनगर महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे यांनी केले आहे. ग्रामीण भागातील आकडेवारी चुकून नगर शहरात नोंदविली गेल्या मुळे ६४ रुग्णांची नोंद दिसते आहे.
मात्र आता मनपा आयुक्त गोरे यांनी याबाबत खुलासा केला असून मनपाचे प्रसिद्धी अधिकारी शशिकांत नजन यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
उपायुक्त यशवंत डांगे आणि आरोग्य अधिकारी डॉ.श्री.सतीश राजूरकर यांनी तातडीने रुग्णांची नावे तपासली असता इतर तालुका भागातील रुग्ण आकडेवारी शहर आकडेवारीत नोंदली गेल्याचे निदर्शनास आले.
आजची शासकीय उपलब्ध माहिती(दि.१० सप्टेंबर २०२१)-*दिनांक १० सप्टेंबर, २०२१*
*आज ७४० रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ७८३ बाधितांची रुग्ण संख्येत भर* *रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३० टक्के*
अहमदनगर: जिल्ह्यात आज ७४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १९ हजार २४५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७८३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार ६४२ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १७५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३३६ आणि अँटीजेन चाचणीत २७२ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४०, जामखेड ०३, नगर ग्रामीण ०९, पारनेर २०, पाथर्डी १७, राहुरी ०१, संगमनेर ६९, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०७, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १९, अकोले १३, जामखेड ०४, कर्जत १४, कोपरगाव २५, नगर ग्रा.११, नेवासा ३४, पारनेर २२, पाथर्डी ०८, राहाता ४१, राहुरी २७, संगमनेर ६१, शेवगाव २६, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर १८ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज २७२ जण बाधित आढळुन आले. मनपा ०५, अकोले ६५, जामखेड ०५, कर्जत २७, कोपरगाव ०८, नगर ग्रा. ०७, नेवासा ०९, पारनेर २३, पाथर्डी १७, राहाता ०५, राहुरी ५३, संगमनेर २६, शेवगाव ०१, श्रीगोंदा १६ आणि श्रीरामपुर ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २३, अकोले ७८, जामखेड २७, कर्जत १७, कोपरगाव १५, नगर ग्रा. ४१, नेवासा ४६, पारनेर ८४, पाथर्डी ४२, राहाता ३७, राहुरी ३३, संगमनेर १२८, शेवगाव ४६, श्रीगोंदा ८९, श्रीरामपूर २०, कॅंटोन्मेंट बोर्ड ०२, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या:३,१९,२४५*
*उपचार सुरू असलेले रूग्ण:५६४२*
*पोर्टलवरील मृत्यू नोंद:६६३५*
*एकूण रूग्ण संख्या:३,३१,५२२*
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*
*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*
*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*