अहमदनगर शहरात घडली धक्कादायक घटना : चहाच्या टपरीवर काम करणार्‍या कामगाराचा खुन

    318

    तोफखान्यात दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल

    अहमदनगर -दोन अल्पवयीन मुलांनी चहाच्या टपरीवर काम करणार्‍या एका कामगाराचा खुन केल्याची धक्कादायक घटना नगर शहरात घडली. संजय छगन लिमगिरे (वय ४८ रा.नगर) या कामगाराचा खुन झाला आहे.संजय यांचा पुतण्या सतिष राजू लिमगिरे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं.९३९/२०२२ भादविक ३०२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात देखील घेतल्याची माहिती हाती आली आहे.३० ऑक्टोबरच्या रात्री दोन अल्पवयीन मुलांनी दगडाने व लाकडी दांडक्याने संजय लिमगिरे यांना डोक्यात दगडाने व लाकडी दांडक्याने मारहाण केली.मारहाणीत गंभीर जखमी झालेले संजय लिमगिरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दोघांवर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here