- अहमदनगर शहरात आज काेराेनाचा विस्फाेट झाला आहे. गेल्या २४ तासांत अहमदनगर शहरात तब्बल १९४ जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नऊ दिवसांत अहमदनगर शहरातील ८१३ जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. काेराेना संसर्गाचा नागरी भागात वेग हा तीन पट असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे अहमदनगर शहरात रुग्ण संख्येत वाढ हाेत आहे. रुग्ण संख्या वाढत जरी असली, तरी रुग्णालयात दाखल हाेऊन उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. आज सकाळपर्यंत रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या ही शंभरच्या आसपास हाेती, अशी माहिती महापालिकेचे आराेग्य अधिकारी डाॅ. सतीश राजूरकर यांनी दिली. 9 दिवसांत 1000 रुग्ण जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५५७ जणांना काेराेनाचे निदान झाले आहे. अहमदनगर शहरात मात्र सातत्याने रुग्ण संख्येत वाढ नाेंदवली जात आहे. गेल्या तीन दिवसांपासून अहमदनगर शहरात तीन दिवसांपासून शंभरच्या पुढे रुग्ण संख्या आढळत आहे. आज तर काेराेना संसर्गाचे रुग्ण हे दाेनशेच्या जवळ गेले आहेत. गेल्या नऊ दिवसांत शहरातील काेराेनाचे रुग्ण एक हजारजवळ गेले आहेत. वाढत्या रुग्ण संख्येमुळे अहमदनगर महापालिकेचे आराेग्य विभाग सतर्क झाला आहे. गर्दीच्या ठिकाणी काेराेना चाचण्या करण्याबराेबर इतर उपाययाेजनांवर भर दिला जाताेय. अहमदनगर शहरात काेराेना रुग्ण संख्या वाढत जरी असली, तरी रुग्णालयात दाखल हाेण्याचे प्रमाण खूप कमी आहे. संसर्ग झालेले शंभरच्या आसपार रुग्ण हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. इतर चारशेवर बाधित हे गृहविलगीकरणात आहेत. त्यांच्यावर महापालिकेकडून लक्ष ठेवले जात असल्याची माहिती डाॅ. सतीश राजूरकर यांनी दिली. शहरातील बाधित तारखेनिहाय पुढीलप्रमाणे :- ▪️ पाच जानेवारी- २१ ▪️ सहा- ३९ ▪️ सात- ५९ ▪️ आठ- ७८ ▪️ नऊ- ६८ ▪️ दहा- ८४ ▪️ ११ जानेवारी- १२६ ▪️ १२ जानेवारी- १४४ ▪️ १३ जानेवारी- १९४