आमदार संग्राम जगताप आणि शहरातील व्यापारी संघटनांनी जिल्हाधिकारी श्री राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन नगर शहरातील बाजारपेठा सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेपर्यंत सुरू ठेवण्यासंदर्भात चर्चा केली व निवेदन दिले. यावेळी व्यापारी सुभाष कायगावकर, माजी नगरसेवक संजय चोपडा, संतोष बोरा, सचिन मुथा, उमेश बोरा, प्रेमराज पोखरणा, रवी गुजराती, राजेंद्र बोथरा, नाना बोजा आदी व्यापारी बांधव उपस्थित होते.

गेल्या दीड-दोन वर्षांपासून कोरोनाच्या महाभयंकर संकट काळात केंद्र व राज्य सरकारने लाॅकडाऊन करत कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. दुसऱ्या बाजूला व्यापारीकरण आर्थिक संकटात सापडले आहे. व्यापाऱ्यांना धीर देण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे. तरी मुंबई-पुणे येथे काल पासून सरकारने घोषणा करून बाजारपेठा खुल्या केले आहेत. त्याचप्रमाणे नगर शहरातील बाजारपेठ खुल्या कराव्यात. जिल्हाधिकारी यांनी व्यावसायिक कारणासाठी ७ ते ४ ही वेळे दिले आहे तरी आता ११ ते ६ वेळेपर्यंत बाजारपेठा सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी. जेणेकरून व्यवसायीकरणाला चालना मिळेल . शहरातील उद्योजकांवर हजारो कामगारचे कुटुंब अवलंबून आहे. त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडे माझ्यासमवेत व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी वेळ वाढवून द्यावा व शनिवार रविवार सुद्धा दुकाने खुली ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी केली.
यावेळी वेळी व्यापारी संतोष बोरा म्हणाले की, कोरोनाच्या महासंकट काळामळे व्यापारी आर्थिक संकटात सापडला आहे. नगर शहरातील बाजारपेठावर हजारो कुटुंबाचे उदरनिर्वाह अवलंबून आहे. वारंवार लाॅकडॉन मुळे बाजारपेठा उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. नगर शहरातील व जिल्ह्यातील ग्राहक या बंदमुळे इतर जिल्ह्यांमध्ये खरेदीसाठी जाऊ लागला आहे. तरी जिल्हाधिकारी साहेब यांनी व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी वेळ वाढवून द्यावा, अशी विनंती यावेळी करण्यात आली.






