
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीकडून उद्या (शनिवारी) विद्युत तारा व उपकरणांच्या दुरुस्तीसाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे नगर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत राहील, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
शनिवारी (ता. 8) मुळा धरण परिसरातील 33 के.व्ही. वाहिनीच्या दुरुस्तीचे काम होणार आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात आला आहे. दरम्यान, मुळानगर येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने नगर शहरातील पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरणार नाहीत.
पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन
शनिवारी (ता. 8) पाणी वाटप होणाऱ्या भागाला रविवारी (ता. 9) तर रविवारी (ता. 9) पाणी पुरवठा होणाऱ्या भागाला सोमवारी (ता. 10) पाणी पुरवठा होईल. सोमवारी (ता. 10) पाणी पुरवठा होणाऱ्या भागाला मंगळवारी (ता. 11) पाणी परवठा होईल. तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.