अहमदनगर वंचित बहुजन आघडीत शहरातील ३०० महिलांचा पक्ष प्रवेश.

५ सप्टेंबर २०२१ रोजी आशीर्वाद लॉन नगर औरंगाबाद रोड हॉटेल सनी पॅलेस शेजारी वंचित बहुजन आघाडीचा संघटन समीक्षा व संवाद मेळावा वंचीतचे प्रदेश अध्यक्षा मा.रेखाताई ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली, प्रदेश उपाध्यक्ष मा.गोविंद दळवी,प्रदेश महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव मा.अरुंधती शिरसाठ,महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष मा.सविताताई मुंढे,प्रदेश उपाध्यक्ष मा.किसन चव्हाण,भटके विमुक्त नेते मा.अरुण जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रेरित होऊन अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाजातील बौद्ध,मातंग,मुस्लिम,भिल्ल, ख्रिस्त,धनगर, माळी ३०० महिलांसह व तृतीयपंथी समुदायातील कार्यकर्त्यां कावेरी शीला शेख सह, स्तुती सरोदे,शीतल शरवाल,मोनाली साळवे,स्मिता सगळगिले,पूनम दळवी,सुवर्ण साठे, ज्योस्त्ना घोडके,हलिमा बागवान, वस्तलाबाई आंबेकर, नूरजहाँ शेख, तयरा शेख,विद्या जाधव,मंदा जगताप,लक्ष्मी गायकवाड,लक्ष्मी शिरसाठ,अनिता शिंदे, सुवर्णा शिंदे,अनिता हिवाळे,स्मिता भंडगे,मयुरी वाघमारे,डिंपल वाघमारे,प्रीती भिंगारदिवे, नुरजान शेख,मुमताज शेख,जयश्री साके, वर्षा सगळगिल,निकिता भिंगारदिवे,अलका वाकडे,अंकिता सगळगीले,मंगल गायकवाड,रंजना गायकवाड या प्रमुख महिला सह शेकडो महिलांनी वंचित बहुजन आघाडीत प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या उपस्थितीत जाहीररित्या पक्ष प्रवेश केला.यावेळी माया अल्हाट यांनी सांगितले की बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व महिला विश्वासाने समाजातील वंचित घटकांना सत्तेत पाठविण्याकरिता एकजुटीने काम करणार गेल्या काही दिवसापासून राजरोस पणे महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे त्याकरिता पीडितांना धीर देत अत्याचार करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी मोठ्याप्रमाणात वंचित बहुजन आघाडी पक्ष नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात महिला जन आंदोलन उभे करून पक्ष वाढीसाठी अहोरात्र परिश्रम करून महिलांचे प्रश्न मार्गी लावणार आहोत असे प्रतिपादन करीत,तसेच युवा आघाडीचे महासचिव विशाल भैय्या साबळे हे वेळोवेळी महिलांचे प्रश्न सोडविण्याकरिता कायम तत्पर असतात त्यांनी आम्हाला योग्य दिशा दाखवत वंचित बहुजन आघाडीचे ध्येय धोरण समजवून सांगत आम्हाला नवी दिशा दाखवली आहे यासाठी त्यांचेही विशेष आभार मानले. यावेळी कर्जत तालुका निरीक्षक ॲड.अरविंद तायडे यांनी सूत्र संचालन केले.पारनेर तालुका निरीक्षक रवींद्र आरु,जिल्हा महासचिव योगेश साठे,जिल्हा सल्लागार जीवन पारधे,जिल्हा उपाध्यक्ष संतोष गलांडे,जिल्हा संघटक फिरोज पठाण,जिल्हा सचिव चंद्रकांत नेटके,युवा महासचिव विशाल साबळे,युवा संघटक सागर ढगे,मनोज कर्डिले,मनोज चव्हाण,देविदास भालेराव,अमर निर्भवणे,संजय जगताप,शुभम ससाणे सह वंचित चे जिल्हा,तालुका पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.युवा आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष जठार यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here