अहमदनगर होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज आणि हाॅस्पिटल अहमदनगर येथे दिनांक १३.०९.२०२१ ते १९.०९.२०२१ पर्यंत त्वचा व केसांच्या समस्या या विकारांवर मोफत तपासणी व उपचार शिबिर
अहमदनगर: अहमदनगर होमिओपॅथीक शिक्षण संस्थेचे अहमदनगर होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज आणि हाॅस्पिटल सावेडी रोड अहमदनगर येथे सोमवार दि. १३.०९.२०२१ ते १८.०९.२०२१ पर्यंत सकाळी ९.३० ते ५.३० या वेळेत त्वचा विकार व केसांच्या समस्या या विकारांवर मोफत तपासणी व उपचार शिबिर आयोजित केले असल्याची माहिती प्राचार्य व रूग्णालयीन अधीक्षक डाॅ सुनिल पवार यांनी दिली.
सदर शिबिरामध्ये इसब, नायटा, सोरियासिस, कोड, पांढरे डाग, नागिन, पिंपल्स, वांग इत्यादी त्वचा विकार आणि केस गळणे, चाई पडणे, टक्कल पडणे, डोक्यात कोंडा होणे, केस दुभांगणे, केस पांढरे होणे इत्यादी केसांच्या समस्या या विकारांवर सखोल चिकित्सा करून मोफत होमिओपॅथीक उपचार करण्यात येणार आहेत. सर्व रूग्णांची तपासणी प्राचार्य डाॅ सुनिल पवार, डाॅ शकील सय्यद, डाॅ मेधा पगारे, डाॅ मिनल सोले, डाॅ माधुरी मोरे आणि डाॅ संकेत लांडे करणार असुन आजार बरा होई पर्यंत दर आठ दिवसाला मोफत होमिओपॅथीक औषध दिले जातील तर अहमदनगर शहर व जिल्ह्यातील सर्व गरजु रूग्णांनी या संधिचा लाभ घ्यावा असे आव्हान संस्थेचे अध्यक्ष डाॅ भुषण अनभुले, उपाध्यक्ष श्री भुषण चंगेडे, सचिव डाॅ डि. एस. पवार, सहसचिव श्री लक्ष्मीनिवास सारडा, खजिनदार डाॅ विलास सोनवणे, संचालक श्री शिवाजी रणसिंग, श्री अभय मुथा, श्री राजेंद्र बोरा, श्री राजेंद्र मेहेत्रे, डाॅ समीर होळकर, डाॅ ऋतुजा चव्हाण प्राचार्य डाॅ सुनिल पवार आणि आर एम ओ डाॅ माधुरी मोरे यांनी केले आहे.
–‐——————‐————-‐——–
Home महाराष्ट्र अहमदनगर अहमदनगर येथे दिनांक १३.०९.२०२१ ते १९.०९.२०२१ पर्यंत त्वचा व केसांच्या समस्या या...