अहमदनगर महाकरंडक ! कलावंतांना प्रोत्साहन देणाऱ्या स्पर्धेचा पडदा उघडला:

अहमदनगर महाकरंडक ! कलावंतांना प्रोत्साहन देणाऱ्या स्पर्धेचा पडदा उघडणार

हौशी रंगकर्मींच्या कलाविष्काराला प्रोत्साहन देणारी, नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणारी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एकांकीका स्पर्धा ‘ अहमदनगर महाकरंडक २०२२, उत्सव रंगभूमीचा, नवरसांचा’ ची महाअंतिम फेरी अहमदनगर येथील माऊली सभागृहात २६ ते २९ एप्रिल दरम्यान जल्लोषात रंगणार आहे.कोरोनामुळे दोन वर्षं स्पर्धा होऊ शकली नव्हती. पण दोन वर्षांचा गॅप पडूनही यंदा स्पर्धेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद उल्लेखनीय आहे.

दरम्यान अनुष्का मोशन पिक्चर्स अ‍ॅण्ड एंटरटेन्मेंट आणि शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित, श्री महावीर प्रतिष्ठान आयोजित ही स्पर्धा झी-मराठीच्या सहयोगाने पार पडणार आहे.या स्पर्धेत महाराष्ट्रात झालेल्या प्राथमिक फेरीतून १२० एकांकिकांमधून तब्बल ३३ एकांकिकांची अंतिम फेरीत निवड करण्यात आली आहे.

पुणे, मुंबई, नाशिक, इस्लामपूर, जळगाव, धुळे, अमरावती, कोल्हापूर आणि नागपूर या केंद्रांवरील प्राथमिक फेरीतील विजेते संघ अंतिम फेरीत दाखल झाले असून,२६ ते २८ एप्रिल दरम्यान सकाळी १० ते रात्री १० आणि २९ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत अंतिम फेरीतील एकांकिकांचे प्रयोग अहमदनगर येथील माऊली सभागृहात होतील.

२९ एप्रिलला सायंकाळी सहा वाजता बक्षीस समारंभ होईल.

अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेत्री निर्माती श्वेता शिंदे आणि अभिनेता दिग्दर्शक अद्वैत दादरकर असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here