अहमदनगर मनपा कोरोना दक्षता पथक आणि तोफखाना पोलीसांची संयुक्त दंडात्मक कारवाई! नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन !

637

महापालिका कोरोना दक्षता पथक आणि तोफखाना पोलीस यांच्या वतीने मंगलगेट,कोठला , कल्याण रोड, बालिकाश्रम रोड,चितळे रोड, कॉटेज कॉर्नर, तपोवन रोड, राज चेंबर परिसरात,औरंगाबाद रोड या ठिकाणी संयुक्त दंडात्मक कारवाई करण्यात आली .

यावेळी दक्षता पथक सनियंत्रण अधिकारी श्री.शशिकांत नजान,तोफखाना पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. श्री. समाधान सोळंकी , दक्षता पथक सहाय्यक श्री.नंदकुमार नेमाणे, ,श्री.राहुल साबळे,श्री.राजेश आनंद,श्री.अनिल आढाव,श्री. राजु जाधव, श्री.विष्णू देशमुख,पोलीस हवालदार श्री.जपे,श्री.केरुळकर,श्री.शिरसाट,श्री. नरसाळे इत्यादी कारवाईत सहभागी होते.

महापालिका दक्षता पथकाने ७० विनामास्क, १४,००० आणि ५ दुकानांनवर २५,००० असे एकूण ३९००० रु दंडात्मक कारवाई केली तर तोफखाना पोलीस यांच्या वतीने १४ पावत्या व ६८०० रु दंडात्मक कारवाई करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here