अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील करोना बाधित रुग्णाचा नगरच्या सुरभी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, गंभीर जखमी. पहाटेच्या सुमारास खिडकीची काच फोडून उडी मारल्याची माहिती.
राज्यात करोनाचा कहर सुरूच आहे. अहमदनगर मध्येही करोनाचे अनेक रुग्ण सापडले आहेत. सर्वसामान्यांनी करोनाचा धसका घेतला आहे. एका रुग्णाने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हा ३२ वर्षीय रुग्ण पाथर्डी तालुक्यातील आहे. त्याच्यावर अनेक दिवसांपासून स्थानिक रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. सोमवारी रात्री त्याला अहमदनगर शहरातील सुरभी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे तिसऱ्या मजल्यावरील रुममध्ये उपचार सुरू होते. आज पहाटेच्या सुमारास त्याने खिडकीची काच फोडून खाली उडी मारली. खाली पडून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर त्याच रुग्णालयात उपचार सुरू होते. या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याने ही उडी पळून जाण्यासाठी मारली होती की आत्महत्या करण्यासाठी हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तोफखाना पोलिसांना घटेनची माहिती देण्यात आली असून, चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.





