अहमदनगर ब्रेकींग: तिसऱ्या लाटेची भीती ; कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा धोका

अहमदनगर ब्रेकींग: तिसऱ्या लाटेची भीती ; कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा धोका

जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव;

एक महिला पॉझिटिव्ह !

नायजेरिया येथून श्रीरामपूर शहरात आलेली

41 वर्षीय महिलेला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी ती महिला व तिचा मुलगा नायजेरिया येथून आले होते. ते कोरोना पॉझिटिव्ह आले होते.

अहमदनगर जिल्हात ओमायक्रॉनचा शिरकाव !

त्यांचे नमूने पुणे येथे तपासणीसाठी पाठविले होते. यातील महिलेचा ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे समोर आल्याने जिल्हात ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे.

कोरोना व्हायरसच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे भारतात आतापर्यंत ३४६ रुग्ण आढळले आहेत. यात सर्वाधिक महाराष्ट्रात ८८, दिल्लीत ५७ रुग्ण सापडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत हा व्हायरस प्रचंड वेगाने संक्रमित करत असल्याचं सांगण्यात आले आहे.राज्यात वाढत आहे. ओमायक्रॉनचे रुग्णही वाढत आहे. तसेच कोरोना बाधितांचा आकडा वाढला आहे. तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे.राज्यात रात्रीची जमावबंदी ? केंद्र सरकारने राज्यांना सतर्क केले आहे.

यापार्श्वभूमीवर राज्यात रात्रीची जमावबंदी लागू करण्याबाबत आज घोषणा होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे याबाबत जनतेला मार्गदर्शन करण्याची शक्यता असून यावेळी ते घोषणा करु शकतात.

ओमायक्रॉन झालेले १०० रुग्ण घरी परतलेदेशभरात आतापर्यंत ३४६ रुग्ण आढळले असून त्यात महाराष्ट्र ८८, दिल्ली ५७, तेलंगणा २४ तसेच इतर राज्यात रुग्ण आढळले आहेत.ओमायक्रॉन संक्रमित १०० रुग्णांवर उपचार करुन त्यांना बरे झाल्यानंतर घरी सोडले आहे.

कोरोनाच्या या नव्या संकटामुळे देशातील जनतेने सतर्क राहावं, काळजी घ्यावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.

त्याचसोबत केंद्रीय पथकाला कमी लसीकरण, जास्त संक्रमण, आरोग्य सुविधेची कमतरता असलेल्या राज्यांना पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here