अहमदनगर ब्रेकिंग : प्रेमी युगुलाची गळफसआत्महत्या

अहमदनगर  टीम, 8 नोव्हेंबर 2020 :-तालुक्यातील अंबड येथील (मोठे दळ सुतारदरा) जंगलात तरूण प्रेमी युगलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
अंबड येथील मोठे दळ सुतारदरा येथील जंगलात दुपारी लहान मुले सिताफळ तोडण्यासाठी गेले असता त्यांना एका शिसवाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक तरुण व तरुणी दिसल्याने त्यांनी पोलीस पाटलांना कळविले.
अकोले पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेतले. तरुणाच्या अंगात चॉकलेटी रंगाचे जर्कीन, काळ्या रंगाची जिन्स पॅँट तर तरुणीच्या अंगात निळ्या रंगाचे कमिज व गुलाबी रंगाची सलवार आहे.मृतदेह कुजलेले असल्याने त्यांची ओळख पटत नव्हती. रात्री उशिरा तरुण अंबड गावातीलच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here