अहमदनगर प्रतिनिधी दि. १९ : अहमदनगर प्रेस क्लब अहमदनगर (नोंदणी क्र. एफ/२०८७/९२) या नोंदणीकृत संस्थेची आज, १९ फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली असून कार्यकारिणीमध्ये १३ जणांचा समावेश करण्यात आला आहे. अहमदनगर प्रेस क्लबचे संस्थापक उपाध्यक्ष सतीश डेरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला व्यासपिठावर अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, ज्येष्ठ पत्रकार दिलीप वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी, राष्ट्र सह्याद्रीचे संपादक करण नवले आदी उपस्थित होते. तर, सभेला सुमारे ९० सभासद उपस्थित होते.
सुमारे ३० वर्षानंतर अहमदनगर प्रेस क्लब अहमदनगर (नोंदणी क्र. एफ/२०८७/९२) या नोंदणीकृत संस्थेचे संस्थापक पदाधिकारी व सदस्य तसेच शहरातील विविध माध्यमांतील पत्रकार एकत्र आले. प्रेस क्लबची स्थापना झाली तेव्हा नगरमध्ये मोजकीच वर्तमानपत्र होती. अलीकडच्या काळात माध्यमांचा विस्तार झाला. त्यामुळे प्रेस क्लबमध्ये सर्व माध्यमांच्या प्रतिनिधींना स्थान मिळावे, हा विचार पुढे आला. त्यानुसार आज झालेल्या सर्वसाधारण सभेत तरुण सदस्यांना स्थान देणारी नवी कार्यकारिणी एकमताने निवडण्यात आली. संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी लवकरच धोरणात्मक बदल करण्यासाठी सभेत सहमती झाली. सभेत एकमताने निवडण्यात आलेली कार्यकारिणी पुढील प्रमाणे.
अहमदनगर प्रेस क्लब (नोंदणी क्र. एफ/२०८७/९२) अध्यक्ष – विठ्ठल लांडगे (दैनिक लोकआवाज), सरचिटणीस – सुभाष मुदळ (दैनिक नगर स्वतंत्र), उपाध्यक्ष – सुशील थोरात (साम टीव्ही), उपाध्यक्ष – विजय माने (सा.दैनिक नवामराठा), खजिनदार – प्रदीप पेंढारे (दैनिक अजिंक्य भारत), सहचिटणीस – लैलेश बारगजे (झी२४ तास), कार्यकारिणी सदस्य – जी एन शेख (दैनिक राष्ट्र सह्याद्री), लहू दळवी (वृत्तछायाचित्रकार), विजय सांगळे (दैनिक आकर्षण), अशोक परुडे (लेटसअप), शिल्पा रसाळ (महिला पत्रकार), मुरलीधर तांबडे(दैनिक प्रभात), आफताब शेख(महाराष्ट्र निरोप्या)
दरम्यान, सभेची सुरुवात करण्यापूर्वी दिवंगत पत्रकारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सभेच्या कामकाजाला ज्येष्ठ पत्रकार सतीश डेरेकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली. सर्वात प्रथम मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त मंजूर करण्यात आले. त्यानंतर सभेसमोर आलेले सर्वविषय एकमताने मंजूर करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार बाबा जाधव यांनी प्रास्ताविक केले. यानंतर, ज्येष्ठ पत्रकार सुभाष चिंधे, शिल्पा रसाळ, आदिनाथ शिंदे, अशोक परुडे, लैलेश बारगजे, बहिरनाथ वाकळे, अमोल भांबरकर, बाबा ढाकणे, सुर्यकांत नेटके आदींनी सभेमध्ये मत मांडले.
यावेळी सभेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सतीश डेरेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ‘येथून पुढे सर्वांनी पत्रकारांची एकजूट अशीच कायम ठेवावी. प्रत्येक लढ्यात आम्ही तुमच्या सोबत आहोत.’ तर, ज्येष्ठ पत्रकार सुभाष गुंदेचा यांनी यावेळी दरवर्षी अहमदनगर प्रेस क्लबतर्फे २१ हजार रुपयांचे पारितोषिक उत्कृष्ट पत्रकाराला देणार असल्याचे जाहिर केले. ज्येष्ठ पत्रकार दिलीप वाघमारे व प्रकाश कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन केले.
नवनिर्वाचित अध्यक्ष विठ्ठल लांडगे म्हणाले की, ‘अहमदनगर शहरातील सर्व पत्रकारांना सोबत घेऊन काम करणार आहे. येथून पुढे अहमदनगर प्रेस क्लबची पुढील वार्षिक सर्वसाधारण सभा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी (१९ फेब्रुवारी) रोजी होईल. त्याच दिवशी नवीन कार्यकारिणीकडे सुत्रे दिली जातील,’ अशी घोषणा केली. सभेचे इतिवृत्त वाचन व सूत्रसंचालन प्रदीप पेंढारे यांनी केले, तर आभार आफताब शेख यांनी मानले.
यावेळी दैनिक राष्ट्र सह्याद्री चे संपादक करण नवले, ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाडेकर, मन्सुर शेख, शिरीष कुलकर्णी, विजयसिंह होलम, अनिल शहा, श्रीकांत वंगारी, आप्पासाहेब शेळके, अन्सार सय्यद, सागर दुस्सल, मयुर मेहता, कुणाल जायकर, संदीप खोटे, प्रशांत पाटोळे, आदिनाथ शिंदे, अशोक तांबे, रविंद्र कदम, तुकाराम कामठे, भास्कर कोडम, संतोष आवारे, सुधीर पवार, राहुल शेळके, अमोल भिंगारदिवे, सागर गोरखे, प्रविण सुरवसे, कुलदीप कुलकर्णी, विक्रम बनकर, मुकुंद भट, यतीन कांबळे, सचिन कलमदाणे, सौरभ गायकवाड, प्रविण संकपाल, अन्वर इकबाल शेख, सागर म्हस्के, विक्रम लोखंडे, इकबाल शेख, सचिन शिंदे, स्नेहा जोशी, शाहरुख शेख, वैशाली टेमकर, कविता भारद्वाज, मनिष कांबळे, उमर सय्यद, विजय मते, शबीर सय्यद, दिपक रोकडे, अतुल लहारे, अमर सय्यद, गोरख शिंदे, प्रशांत शिंदे, कबिर बोबडे, श्रीकांत खांदवे, गीताराम शिंदे, स्वामिनी मुंगीकर, सय्यद शफी, खान आसिफ, वाजिद शेख, उदय जोशी, संदीप दिवटे यांच्यासह आदी पत्रकार उपस्थित होते.



