अहमदनगर नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेची विशेष सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली बँकेचे दोन्ही विषय नामंजूर

    269

    अहमदनगर नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेची विशेष सर्वसाधारण सभा आज खेळीमेळीत संपन्न झाली. सभेपुढे कायदा कलम ३० अन्वये सन २०१४ ते १९ या सालातील तत्कालीन संचालकांचे सभासदत्व निष्कासन व परिणामी कलम ४३ (१) अन्वये संचालक मंडळ सदस्य म्हणून अपात्र ठरविणे व कायदा कलम ४७ अन्वये सन २०२१ ते २०२६ सालासाठी संबंधित निर्वाचित संचालक मंडळ सदस्यांचे निष्कासन करणे हे दोन महत्वाचे विषय ठेवण्यात आले होते. बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी एम.पी.साळवे यांनी सुरवातीला सभेच्या नोटीसीचे वाचन करून सभेच्या अध्यक्षपदी बँकेचे संचालक ईश्वर बोरा यांची नियुक्ती केली. त्यास संचालक सचिन देसरडा यांनी अनुमोदन दिले. त्याप्रमणे अध्यक्ष ईश्वर बोरा यांनी सभेच्या कामकाजास सुरवात करून उपस्थित शेकडो सभासदांपुढे विषय पत्रिकेवरील दोन विषय मांडले. त्यास सर्व सभासदांनी नामंजूर…नामंजूर अशा जोरदार घोषणा देत विषय नामंजूर केले. यावेळी नामंजूर असे शब्द लिहिलेले फलकही सभासदांनी झळकावले.

    सभासदांनी झळकावले नामंजूरचे फलक | जुन्या संचालकांना अपात्र ठरवण्याचा ठराव सभासदांना अमान्य

    यावेळी व्यासपीठावर विद्यमान व्हाईस चेअरमन दीप्ती गांधी, संचालक कमलेश गांधी, राहुल जामगावकर, संपत बोरा, गिरीश लाहोटी, संगीता गांधी, मनीषा कोठारी, अतुल कासट आदी उपस्थित होते.सभा सुरु होताच सभासद राजेंद्र गांधी यांनी काही प्रश्न उपस्थित केला. मात्र पीठासीन अधिकारी ईश्वर बोरा यांनी त्यांचे प्रश्न सभेपुढे घेवू शकत नाही असे सांगून गांधींचे प्रश्न फेटाळून लावत सभेच्या कामकाजास सुरवात केली.

    यावेळी जुन्या संचालकांना अपात्र ठरवणारा विषय नामंजूर होताच सभासदांमध्ये खाली बसलेले बँकेचे विद्यमान चेअरमन अशोक कटारिया, संचालक दिनेश कटारिया, अनिल कोठारी, अजय बोरा, मनेश साठे व राजेंद्र अग्रवाल आदींना व्यासपीठावर बोलावण्यात आले. दोन्ही विषय नामंजूर झाल्याने सर्व संचालकांनी सभासदांचे आभार मानले. यावेळी उपस्थित सभासदांनी स्व.दिलीप गांधी अमर रहे…च्या जोरदार घोषण दिल्या. विद्यमान चेअरमन अशोक कटारिया यांनी उपस्थित विरोधकांचा खरपूस समाचार घेत मनोगत व्यक्त केले. दिनेश कटारिया यांनी साभार मानले. यावेळी सर्व शाखांमधून मोठ्या संख्यने सभासद उपस्थित होते.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here