अहमदनगर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा

    197

    भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार ३० सप्टेंबरपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस हाेण्याची शक्यता वर्तवली आहे. या कालावधीत शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. वादळी वारा, मेघगर्जनेसह विजा पडणे व जाेरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. धाेकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्ष‍ित ठिकाणी आश्रय घ्यावा. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस ठाण्याशी अथवा दूरध्वनी क्र. १०७७ (टोल फ्री) वर संपर्क साधावा.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here