अहमदनगर जिल्ह्यात आज रूग्ण संख्येत इतकी वाढ यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४४६७ झाली #Covid19 #Ahmednagar अहमदनगर जिल्ह्यात आज रूग्ण संख्येत इतकी वाढ यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४४६७ झाली *दिनांक: ३० सप्टेंबर २०२०, रात्री ७ वा* *आतापर्यंत ३८ हजार ८३८ रुग्ण बरे होऊन परतले घरी* *रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.२२ टक्के* *आज ४७३ रुग्णांना डिस्चार्ज तर ६७४ बाधितांची रुग्णसंख्येत भर* *अहमदनगर*: जिल्ह्यात आज ४७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ हजार ८३८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.२२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६७४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४४६७ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ६९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २२८ आणि अँटीजेन चाचणीत ३७७ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३१,अकोले १२, कर्जत ०२, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०५, पारनेर ०६, पाथर्डी ०१, राहुरी ०१, संगमनेर ०१, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०२, मिलिटरी हॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २२८ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ५७,अकोले ०८, जामखेड ०५, कर्जत ०५, कोपरगाव ०७, नगर ग्रामीण २६, नेवासा १३, पारनेर १३, पाथर्डी ०५, राहाता १२, राहुरी २०, संगमनेर २७, शेवगाव ०३, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर २२ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ३७७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ३२, अकोले १८, जामखेड ३०, कोपरगाव २३, नगर ग्रामीण ५२, नेवासा ४०, पारनेर ११, पाथर्डी १९, राहाता ३६, राहुरी १६, संगमनेर ३९, शेवगाव २१, श्रीगोंदा २१, श्रीरामपूर १७, कॅन्टोन्मेंट ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. आज ४७३ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा १०२, अकोले ५२, जामखेड ३५, कर्जत १९, कोपरगाव २३, नगर ग्रामीण २९, नेवासा २४, पारनेर १२, पाथर्डी २२,, राहाता ५०, राहुरी १२, संगमनेर २७, शेवगाव २२, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर १६, कॅंटोन्मेंट ०५, मिलिटरी हॉस्पिटल १२ अशा रुग्णांचा समावेश आहे. * बरे झालेली रुग्ण संख्या=३८८३८ * उपचार सुरू असलेले रूग्ण=४४६७ * मृत्यू:७१८ * एकूण रूग्ण संख्या=४४०२३ * (स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर) *घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा* *प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा* *स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या* *अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा* *खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका*
ताजी बातमी
महाराष्ट्रात खळबळ उडवणारा दावा….. शिंदे गटातील ३५ आमदार भाजपात जाणार…..
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यावर ठाकरांच्या सामनातून भाष्य करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे भाजपला नकोसे...
नगर महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही; आयुक्त यशवंत डांगे
महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही
मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत...
नगर-मनमाड महामार्गाच्या कामाला वेग ; खासदार नीलेश लंके म्हणाले, काहींनी तर जनतेची दिशाभूल
“सुरुवातही माझी पूर्णताही माझीच!",नगर-मनमाड महामार्ग कामाला वेगपाहणीदरम्यान खासदार लंके यांचा विरोधकांवर टोलाराहुरी : प्रतिनिधीनगर-मनमाड महामार्गाच्या सुरू असलेल्या...
चर्चेत असलेला विषय
कॉनमनसोबत मुलाच्या संबंधांमुळे गुजरात सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने राजीनामा दिला
श्रीनगर: गुजरातच्या मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी हितेश पंड्या यांनी त्यांचा मुलगा "पंतप्रधान कार्यालय" च्या बनावट 'अधिकृत' टीमचा...
संकल्प सत्याग्रह: भाजपने अनेकदा गांधी कुटुंबाचा अपमान केला, पण आम्ही गप्प बसलो, प्रियंका वड्रा
काँग्रेसच्या प्रियांका गांधी म्हणाल्या की, संसदेत त्यांच्या वडिलांचा अपमान करण्यात आला आणि त्यांच्या भावाला मीर जाफरसारखे नाव...
जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
अहमदनगर - सलग दुसऱ्या दिवशी देखील जिल्ह्यात कोरोनाबधित रूग्ण संख्यात कमी पाहिला मिळाली आहे.जिल्ह्यात आज 600 नविन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे....
कंत्राटे, टेंडर्सच्या मागे लागू नका; मतदारसंघाच्या हिताचा विचार करा, भाजप आमदारांना मुख्यमंत्र्यांनी दिला सल्ला
कॉन्ट्रॅक्ट, टेंडरच्या मागे लागू नका, मतदारसंघाच्या व्यापक हिताचा विचार करून कामे करा. आपल्या पक्षाचा संस्कार वेगळा आहे,...



