अहमदनगर जिल्हयातील नागरिकांना कळविणेत येते की,मा. प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन यांचेकडील अ.शा.पत्र दि. 12/10/2021 व मा.अपर मुख्य सचिव,सार्वजनिक आरोग्य विभाग,महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र दि.13/10/2021अन्वये कळविले आहे की, मा.सर्वोच्च न्यायालयाकडील रिट याचिका (सिव्हील) क्र.539/2021 मधील दि.30/06/2021 व दि.04/10/2021 रोजीचे आदेशानुसार व त्याअनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे निर्गमित दि. 11/09/2021 चे मार्गदर्शक सूचनानुसार कोव्हीड 19 ने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना रक्कम रु.50,000/- सानुग्रह मदत देण्याचे राज्यांना सूचित केलेले आहे. तसेच मदत व पुनर्वसन विभाग,महाराष्ट्र शासन यांचेव्दारे सानुग्रह मदत वितरणाबाबतचा ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा सविस्तर तपशिल सूचित करण्यात येईल असे कळविले आहे.अहमदनगर जिल्हयातील कोव्हिड 19 ने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना रक्कम रु.50,000/- इतकी सानुग्रह मदत वाटपासाठी सक्षम प्राधिकरण व प्राधिकरणाचा पत्ता खालीलप्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे.कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटतम नातेवाईकास सानुग्रह सहाय्यला अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ विकसित https://majhigrampanchayat.com/news.php?id=299&type=10*जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अहमदनगर*पत्ता – आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन शाखा, नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालय,अहमदनगरजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष जिल्हाधिकारी अहमदनगर हे आहेत. मदत व पुनर्वसन विभाग,महाराष्ट्र शासन यांचेव्दारे अर्ज सादर करण्याबाबतची ऑनलाईन कार्यपध्दती (अर्ज करण्याचे ठिकाण,विहित नमुना इ.) (डॉ.राजेन्द्र ब. भोसले)जिल्हाधिकारी तथा अध्यक्षजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहमदनगरसंपर्क ::- सर्व सेतु केंद्र
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
विशेष: GST बदलामुळे 40 ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना 10,000 कोटी रुपयांचा फटका बसू शकतो
वस्तू आणि सेवा कर (GST) अधिकारी 40 ऑनलाइन गेमिंग कंपन्यांविरुद्ध नवीन कर मागणी नोटिसा काढणार आहेत, असे...
राज्यात लवकरच पोलीस भरती
पोलीस दलात सामील होण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. पोलीस भरतीबाबत (Maharashtra Police Recruitment 2022) मोठी बातमी समोर आली आहे.
मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी वाढणार? एनआयएला मलिकांशी संबंधित संशयित व्यवहार आढळले : सूत्र
मुंबई : डी गँग अर्थात दाऊदशी संबंधित 29 ठिकाणी एनआयएकडून छापे सुरु आहेत. आता याच प्रकरणात मंत्री नवाब मलिकांच्या अडचणी वाढण्याची...






