अहमदनगर जिल्ह्यातील कोव्हिड – 19 मुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना ५० हजार सानुग्रह अनुदान

अहमदनगर जिल्ह्यातील कोव्हिड – 19 मुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना ५० हजार सानुग्रह अनुदान

अहमदनगर जिल्‍हयातील नागरिकांना कळविणेत येते की,मा. प्रधान सचिव, आपत्‍ती व्‍यवस्‍थापन, मदत व पुनर्वसन यांचेकडील अ.शा.पत्र दि. 12/10/2021 व मा.अपर मुख्‍य सचिव,सार्वजनिक आरोग्‍य विभाग,महाराष्‍ट्र शासन यांचेकडील पत्र दि.13/10/2021अन्‍वये कळविले आहे की, मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाकडील रिट याचिका (सिव्‍हील) क्र.539/2021 मधील दि.30/06/2021 व दि.04/10/2021 रोजीचे आदेशानुसार व त्‍याअनुषंगाने राष्‍ट्रीय आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाव्‍दारे निर्गमित दि. 11/09/2021 चे मार्गदर्शक सूचनानुसार कोव्‍हीड 19 ने मृत झालेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या वारसांना रक्‍कम रु.50,000/- सानुग्रह मदत देण्‍याचे राज्‍यांना सूचित केलेले आहे.

तसेच मदत व पुनर्वसन विभाग,महाराष्‍ट्र शासन यांचेव्‍दारे सानुग्रह मदत वितरणाबाबतचा ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा सविस्‍तर तपशिल सूचित करण्‍यात येईल असे कळविले आहे.अहमदनगर जिल्‍हयातील कोव्हिड 19 ने मृत झालेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या वारसांना रक्‍कम रु.50,000/- इतकी सानुग्रह मदत वाटपासाठी सक्षम प्राधिकरण व प्राधिकरणाचा पत्‍ता खालीलप्रमाणे प्रसिध्‍द करण्‍यात येत आहे.

कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटतम नातेवाईकास सानुग्रह सहाय्यला अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ विकसित
https://majhigrampanchayat.com/news.php?id=299&type=10
जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण, अहमदनगर

पत्‍ता – आपत्‍ती व्‍यवस्‍थापन मदत व पुनर्वसन शाखा,

नियोजन भवन,

जिल्‍हाधिकारी कार्यालय,

अहमदनगर जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे पदसिध्‍द अध्‍यक्ष जिल्‍हाधिकारी अहमदनगर हे आहेत.

मदत व पुनर्वसन विभाग,महाराष्‍ट्र शासन यांचेव्‍दारे अर्ज सादर करण्‍याबाबतची ऑनलाईन कार्यपध्‍दती (अर्ज करण्‍याचे ठिकाण,विहित नमुना इ.)

डॉ.राजेन्‍द्र ब. भोसले

जिल्‍हाधिकारी तथा अध्‍यक्ष

जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण अहमदनगर

संपर्क ::- सर्व सेतु केंद्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here