अहमदनगर- जिल्हा रुग्णालय जळीतकांड प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक सुनील पोखरणा यांना अटक आणि सुटका :

अहमदनगर- जिल्हा रुग्णालय जळीतकांड प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक सुनील पोखरणा यांना अटक आणि सुटका.

अहमदनगर- दिनांक :28 फेब्रू2022गेल्यावर्षी ऐन दिवाळी मध्ये अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कोरोना आयसीयू कक्षाला लागलेल्या आगीमध्ये चौदा रुग्णांचा जळून आणि गुदमरून मृत्यू झाला होता.

त्यानंतर याबाबत नगर शहरातील तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये रुग्णालयातील एक डॉक्टर, दोन नर्स आणि एक कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

त्यांना अटकही झाली.त्यानंतर जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा यांच्यावर अनेक आरोप झाले.

एकूणच या प्रकरणाची चौकशी राज्य सरकारने नाशिक विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती मार्फत केली.

या चौकशीच्या अहवालानुसार दोषी असल्याचा अहवाल येत असल्याची माहिती आहे त्या अनुषंगाने आज पोलिसांनी डॉक्टर पोखरणा यांना पोलिस ठाण्यामध्ये बोलावण्यात आले होते.

मात्र दरम्यान डॉक्टर पोखरणा यांनी उच्च न्यायालयातून जामीन मिळवलेला असल्याने त्यांना अटक केल्यानंतर त्यांची सुटका झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

एकूणच या प्रकरणांमध्ये या अगोदर तोफखाना पोलीस ठाण्यांमध्ये चार जणांविरोधात गुन्हा दाखल असून आता पोखरणा यांच्या निमित्ताने या गुन्ह्यातील आरोपींची संख्या पाच झाली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here